आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Warning: Apple Is Dangerous Wax coated Apples Are Sold In Indore City

चमकदार सफरचंद आरोग्यासाठी घातक, केला जातो धोकादायक मेणाचा वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- ‘एक सफरचंद दररोज खा आणि डॉक्टरांपासून लांब राहा’ हा सल्ला आपण आरोग्याच्या बाबतीत नेहमीच ऐकत असतो. मात्र, बाजारातील लाल, चमकदार सफरचंद आरोग्याचे गणित बिघडवू शकतात. याचे कारण आहे सफरचंदावरील लालबुंद चकाकी. ही चकाकी मेणाने येते.
इंदूरच्या अन्न विभागाने सफरचंदाचे नमुने तपासणीसाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठवले. प्रयोगशाळेने "हे सफरचंद मनुष्याच्या सेवनायोग्य नाही' असा शेरा पाठवला आहे.

प्रयोगशाळेमध्ये इन्फ्रारेड तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सफरचंदाची तपासणी करण्यात आली. दरम्यान, अशा चकाकणाऱ्या सफरचंदावर मेणाचे थर असल्याचे आढळून आले. हे मेण पॅराफिन प्रकारचे असते आणि त्याचा उपयोग मेणबत्ती बनवण्यासाठी केला जाते. वास्तविक हे मेण मानवी आरोग्यासाठी घातक मानले जाते. अन्न व सुरक्षा विभागाचे मुख्य अधिकारी मनीष स्वामी यांनी या अहवालाला दुजोरा दिला आहे. सफरचंद विकत घेणाऱ्यांनी ते कितीही स्वच्छ धुतले तरीही मेण सफरचंदावरच कायम राहते. दीर्घकाळापर्यंत अशा प्रकारचे सेवन केल्याने त्यावरील मेण पोटात मोठ्या प्रमाणात जमा होते. त्यामुळे पोटाच्या आजारांसोबतच मेंदूशी निगडित आजारही संभवतात.

शरीर पचवू शकत नाही मेण
सफरचंदावरील मेण शरीर पचवू शकत नाही. जमा झाल्यानंतर पोट, किडनी तसेच यकृतावर याचे घातक परिणाम होतात. अल्सर, गॅस, आतडे कमजोर होण्यासारख्या अडचणी यामुळे येऊ शकतात. मेणाचे टॉक्झिन शरीरात विष तयार करतात. त्यामुळे मेंदूचेही आजार उद््भवू शकतात.
डॉ. अतुल शेंडे, गॅस्ट्रो अँट्रोलॉजिस्ट, एमवायएच

बराच दिवस टिकतो ताजेपणा
मेणाचे थर चढवल्यानंतर महिनाभर आधीचे सफरचंदही अगदी ताजे वाटू लागते. त्यामुळे सफरचंदाचे वजन घटतही नाही आणि ते सडतसुद्धा नाही.

या राज्यांतून सर्वाधिक प्रकरणे आयात करण्यात आलेल्या सफरचंदावर पॅराफिनचे थर चढवल्याची सर्वाधिक प्रकरणे दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि चेन्नईतून आली आहेत. हे सफरचंद अमेरिका, चीन, न्यूझीलंडमधून आयात होतात.
नैसर्गिक मेणाचा दावा खोटा : सफरचंद सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक वर्षांपासून नैसर्गिक मेणाचा वापर होत आहे. हे मेण मधमाशांच्या पोळ्यातून मिळते. व्यावसायिक हेच मेण वापरत असल्याचा दावा करतात. मात्र, बहुतांश प्रकरणात पॅराफिन मेणच आढळते.