आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४००० हॉटेल, रेस्तराँमध्ये पाणी वाचवण्याची मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - हॉटेल्स व रेस्तराँमध्ये सर्व्ह केल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची आता बचत केली जाईल. फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एफएचआरएआय) आणि दैनिक भास्कर समूहाने यासाठी पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत एफएचआरएआयचे सदस्य असलेल्या ४००० हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये ही मोहीम राबवण्यात येईल. तेथे अर्धा ग्लास पिण्याचे पाणी सर्व्ह केले जाईल. पाण्याच्या बचतीसाठी अतिथींना व ग्राहकांनाही विनम्र आवाहन करण्यात येईल. हवे असल्यास आणखी पाणी देण्यात येईल.

इंदूरमध्ये २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान आयोजित एफएचआरएआयच्या ५१ व्या राष्ट्रीय परिषदेत या मोहिमेचा शुभारंभ होईल. दैनिक भास्करने ‘जल सत्याग्रह’ या आपल्या मोहिमेअंतर्गत एफएचआरएआयसोबत हा पुढाकार घेतला आहे. ४००० हॉटेल व रेस्तरांच्या टेबलांवर टेंट कार्ड लावण्यात येतील. त्यावर पाणी बचतीचा संदेश असेल.

१९५५ मध्ये एफएचआरएआयची स्थापना झाली. हॉटेल उद्योगाला विकसित करण्यासाठी व त्यांच्या क्षमता वाढीसाठी संघटना नेहमीच अग्रेसर राहिले आहे. जगात वेगाने बदल होत आहेत. भारताच्या पर्यटन उद्योगांची हॉटेल उद्योग ही पूर्वअट आहे. त्यामुळे एफएचआरएआयची भूमिकाही महत्त्वाची आहे. या वर्षीच्या परिषदेची थीम ‘ब्रँड इंडिया’ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ५ टी व्हिजनने ही थीम प्रेरित आहे. व्हिजनमध्ये टॅलेंट, ट्रेडिशन, टुरिझम, ट्रेड, टेक्नॉलॉजी या पाच ‘टी’चा समावेश आहे.

५१ वर्षांत प्रथमच ही परिषद मध्य प्रदेशात होत आहे. मध्य प्रदेश कमिटी, एच अँड आरए., वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष सुमीत सुरी यांनी सांगितले की, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया आणि इंदूर हॉटेलिअर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेत हॉटेल्स व रेस्टॉरंट क्षेत्रासाठी ८ बिझनेस सेशन्स होतील. या वर्षी आंतरराष्ट्रीय वक्ते जॉन गेरॉनडेलिस उपस्थित राहतील. २४ सप्टेंबर रोजी एफएचआरएआय पुरस्कार प्रदान केले जातील. या प्रतिष्ठित पुरस्कारांचे हे १६ वे वर्ष आहे. हॉस्पिटॅलिटी उद्योगात विशेष कामगिरी बजावणाऱ्यांना वर्ष २००० पासून हे पुरस्कार दिले जातात. या वर्षी १६ श्रेणींमध्ये २४७ प्रवेशिका आल्या आहेत.

२२ सप्टेंबर रोजी उद््घाटन समारंभाला केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत, एफएचआरएआयचे अध्यक्ष भारत मलकानी, परिषद आयोजन कमिटीचे अध्यक्ष विवेक नायर व एफएचआरएआयचे महासचिव अमिताभ देवेंद्र आदी उपस्थित राहतील.
बातम्या आणखी आहेत...