आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोपी परिधान करून धर्म बुडत नाही!, अभिनेते रझा मुराद यांचा मोदीवर हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रशंसा करण्याच्या बहाण्याने नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. टोपी घालून कुणाचा धर्म बुडत नसतो. जे लोक पंतप्रधानपदावर दावा सांगतात त्यांनी शिवराज यांच्याकडून काही शिकावे, अशा शब्दांत रझा मुराद यांनी नाव न घेता मोदींना टोला लगावला. रझा मुराद पुढे म्हणाले, कुत्र्याच्या पिल्लांना नव्हे तर मुस्लिमांच्या मुलांना ईदच्या शुभेच्या देण्यासाठीच शिवराज इथे आले असतील.


रमजान ईदनिमित्त शिवराज इतर नेत्यांसह ईदगाह येथील व्यासपीठावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत होते. त्या वेळी त्यांच्या शेजारी उभे राहून मुराद यांनी मनमुराद फटकेबाजी केली. ते म्हणाले, या देशात जबाबदार पदावर बसणा-या व्यक्तींनी सगळ्या लोकांना सोबत घेऊन जायला हवे. शिवराज ते काम मोठ्या कुशलतेने करीत आहेत. शिवराज यांचा तर टोपी घालण्यासही आक्षेप नाही. टोपी परिधान करणे वाईट नाही. परंतु टोपी घालणे नक्कीच वाईट गोष्ट आहे. आपण मोदींना उद्देशून बोलत आहात का,असे मुराद यांना विचारले असता ते म्हणाले, या चांगल्या मुहूर्तावर मला कुणाचेही नाव घ्यायचे नाही. परंतु समझदार मेरा इशारा समझ गए होंगे. याप्रसंगी शिवराज यांनी मात्र मौन बाळगणेच पसंत केले.


ईदच्या दिवशीही राजकारण
भोपाळ मध्ये शिवराजजी यांच्या शेजारी उभे राहिलेले ‘सी’ग्रेड अभिनेते रझा मुराद यांनी मोदींवर टिका केली आहे.ईदच्या दिवशी इतके घाणेरडे राजकारण. हे कसे झाले ?’’
उमा भारती,उपाध्यक्ष,भाजप