आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्‍यप्रदेशात पावसाचा कहर, महापूरामुळे जनजीवन विस्‍कळीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्‍जेनमध्‍ये मंदीरे आली पाण्‍याखाली. - Divya Marathi
उज्‍जेनमध्‍ये मंदीरे आली पाण्‍याखाली.
इंदूर/ भोपाळ - मध्‍यप्रदेशात पावसाने दोन दिवसांपासून कहर केला आहे. 24 तासात भोपाळ, इंदूर, उज्‍जेनसह इतर शहरे जलमय झाली आहेत. सखल भागात पाणी शिरल्‍याने जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. शिप्रा नदीच्‍या पुरामुळे परिसरातील मंदीरे पाण्‍याखाली गेली आहेत. इंदूरच्‍या सर्व रस्‍त्‍यांवरही दोन ते तीन फुट पाणी साचले आहे.
पाच हजार नाग‍रिक सुरक्षितस्‍थळी
उज्‍जेनमध्‍ये मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरुन वाहात आहेत. त्‍यामुळे पाच हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्‍यात आले आहे. जिल्‍हाधिकारी कवींद्र कियावत आणि एसपी मनोहर वर्मा यांनी शिप्रा नदीचे पूजन करून सगळ्यांसाठी प्रार्थना केली.
सोमवारी शाळा, महाविद्यालयांना सुटी
इंदूर, भोपाळ आणि रतलाम मार्गावरील रेल्‍वे पटरीवर पाणी साचल्‍याने रेल्‍वेसेवा विस्‍कळित झाली आहे. त्‍यामुळे इंटरसिटी, भिंड आणि अवंतिका एक्‍सप्रेस या गाड्या स्‍टेशनवरच उभ्‍या आहेत. जिल्‍हाधिका-यांनी शाळा, महाविद्यालयांना साेमवारी सुटी जाहीर केली आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लि‍क करून पाहा, महापुराचे फोटो..