आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जागेवर गमावला 178 व्‍यक्‍तींनी जीव; एका कुटुंबांने घालवली भीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालिका प्रशासनाने या ठिकाणी लावलेली सूचना. - Divya Marathi
पालिका प्रशासनाने या ठिकाणी लावलेली सूचना.
भोपाळ - केरवा डॅम्‍पमधील जंगल कॅम्‍प्‍च्‍या पुढे असलेल्‍या एका धरणाला 'मौत का कुऑं ' म्‍हणूनच ओळखले जाते. आतापर्यंत या ठिकाणी तब्‍बल 178 व्‍यक्‍तींचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे या परिसराकडे सहसा कुणी फि‍रकत नाही. मात्र, ही भीती दूर करण्‍याचे कार्य विश्‍वास घुसे यांच्‍या कुटुंबांने केले आहे. त्‍यामुळे या ठिकाणी आता निडर होऊन जाता येते. घुसे दाम्‍पत्‍याच्‍या सोळा वर्षीय मुलाचा याच डॅम्‍पमध्‍ये मृत्‍यू झाला होता. त्‍यामुळे भविष्‍यात या ठिकाणी असा अपघात होऊ नये यासाठी त्‍यांनी येथे ओल पाणी असलेली जागा दगडाने भरून काढली. त्‍यासाठी त्‍यांना रोटरी क्‍लबचे सहकार्य मिळाले.
दहावीची परीक्षा संपल्‍यानंतर 21 मार्च 2015 रोजी घुसे यांचा मुलगा मंदार हा या परिसरात पिकनिकसाठी आला होता. मात्र, या ठिकाणी त्‍याचा अपघाती मृत्‍यू झाला. त्‍यामुळे घुसे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण, आपण आपल्‍या मुलालाने गमावले इतर कुणावर ही वेळ येऊ नये, असे या विचारातून त्‍यांनी 'मंदार-एंड-नो-मोर' हे अभियान त्‍यांनी हाती घेतले आणि या धरणातील खोली भरून काढली.
चार म‍हिने लागले
विश्‍वास यांनी सांगितले, की मुलाचा मृत्‍यू झाला. यानंतर आम्‍ही अनेक वेळा या परिसरात गेलो. एकाच विचार मनात येत होता की, या ठिकाणी कोणत्‍या कारणाने तब्‍बल 1 78 व्‍यक्‍तींचा मृत्‍यू झाला. त्‍यासाठी आम्‍ही त्‍या जागेवरील पाण्‍याचाअपसा केला तर तिथे अरुंद खड्डा दिसून आला. त्‍यातून आम्‍ही तो बुजवला. त्‍यासाठी शनिवार, रविवार हे दिवस देत होतो. जून अखेर हे काम संपवले.
पुढील स्‍लाइड्स पाहा संबंधित फोटोज.....
बातम्या आणखी आहेत...