आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज 18 तास काम करतात आपले पंतप्रधान, असे आहे नरेंद्र मोदींचे डेली रुटीन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर/दिल्ली- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी इंदूरजवळील महू येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहाणार आहे. महू येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता.

आम्ही आपल्याला नरेंद्र मोदी यांच्या दिनचर्याविषयी माहिती सांगणार आहे. मोदी दिवसभरातील 24 तासांपैकी 18 तास काम करतात. मोदी आपल्या जीवनशैलीमुळे देशातच नव्हे तर विदेशात आप ला ठसा उमवटवला आहे. दरम्यान, ‘टाइम’ मॅगझिनतर्फे नामांकित करण्यात येणाऱ्या जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश आहे.

मोदी एक प्रबळ आवाज...
‘नरेंद्र मोदी हा जागतिक व्यासपीठावरील एक प्रबळ आवाज आहे. 2015 साली काही राजकीय वादांमुळे त्यांचा स्वत:चा अजेंडा बाजूला पडला असला, तरी त्यांचा देश आर्थिक विकासाच्या बाबतीत जगाचे नेतृत्व करतो’, असे ‘टाइम’ने म्हटले आहे. जगातील सर्वाधिक प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये मोदी यांचे गेल्या वर्षीही नामांकन करण्यात आले होते.

असे आहे पंतप्रधानांचे डेली रुटीन...
पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज 18 तास काम करतात. आपल्या मंत्रालयातील मंत्र्यांना देखील त्यांना जास्तीत जास्त तास काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक कामावर मोदी बारीक लक्ष ठेवून असतात. प्रत्येक कामाचे ते मॉनिटरिंग करतात. राजकीय विश्लेषकांच्या मते, मोदींची काम करण्‍याची पद्धत 'कॉर्पोरेट' आहे. मोदी आपल्या भाषणांमधून सीईओप्रमाणे टिप्स देताना दिसतात. देश असो वा विदेशात मोदींच्या अनोख्या शैलीची मोठी प्रशंसा केली जाते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून इंफोग्राफिक फोटोजमधून पाहा, पंतप्रधान मोदींची संपूर्ण दिनचर्या...