आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WhatsApp मेसेजने बदलले या तरुणीचे आयुष्य, कहाणी वाचून डोळे ओलावतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्षाबंधनाला हिनाकडून राखी बांधून घेताना तरुण. - Divya Marathi
रक्षाबंधनाला हिनाकडून राखी बांधून घेताना तरुण.
इंदूर (मध्य प्रदेश)- WhatsApp शेअर झालेल्या एका मेसेजने एका तरुणीचे आयुष्य बदलले आहे. येथील हिना सोलंकी (वय 14) या तरुणीला हृदय रोग होता. तिला चाळीस हजार रुपयांची तातडीची गरज होती. गावातील पंचायत सचिवाने याचा एक व्हॉट्सअॅप मेसेज तयार केला. तो मित्रांमध्ये शेअऱ केला. हा मेसेज वाचून गावातील 20 तरुण समोर सरसावले. त्यांनी हिनाकडून राखी बांधून तिला आर्थिक मदत केली.
हिनाच्या हृदयाला होते छिद्र, सहा महिन्याची असताना वडीलांचा मृत्यू
- हिना सहा महिन्यांची होती तेव्हा वडीलांचे निधन झाले.
- हिनाची आई सावित्री यांनी शेतात मजुरी करुन तिला मोठे केले. तिला चार मोठया बहिणी आहेत. त्यांचे लग्न झाले आहे. जन्मापासूनच हिनाच्या हृदयाला छिद्र होते. त्यामुळे ती लगेच थकायची.
- सावित्री यांनी शासकीय मदत मिळवत हिनाचे शासकीय रुग्णालयात ऑपरेशन केले. पण औषधांसाठी जवळ पैसे नव्हते.
- सावित्री यांनी घर गहाण ठेवले. पण तरीही आवश्यक पैसे काही जमले नाही. ही बाब गावातील पंचायत सचिव सोहनसिंह बडवाया यांना समजली. त्यांनी काही मित्रांसोबत हिनाला मदत करण्याचा निर्णय घेतला.
- त्यांनी मदतीचा एक मेसेज तयार केला. काही ग्रुप्समध्ये शेअर केला. त्यानंतर हिनाला मदत येण्यास सुरवात झाली.
- राखीच्या दिवशी अनेक तरुण मदतीसाठी पुढे आले. त्यांनी हिनाच्या हाताने राखी बांधून घेतली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, हिनाच्या हाताने राखी बांधून घेताना परिसरातील तरुण....
बातम्या आणखी आहेत...