आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 मुलींची Shocking लव्ह स्टोरी: एकीने देश सोडला दुसरी हनिमुनला घेऊन गेली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्य प्रदेश)- फेसबुकवर त्या दोघींची आधी ओळख आणि नंतर प्रेम झाले. प्रेम गहरे होते. त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी होती. पण त्यात अडथळे होते. एक इंदूरची तर दुसरी बांगलादेशी होती. प्रेमासाठी काही पण करण्याची मात्र त्यांची तयारी होती. बांगलादेशी तरुणी शिक्षणाचे कारण देऊन थेट इंदूरला आली. दोघी येथे जोडिदाराच्या भूमिकेत राहू लागल्या.
कुटुंबीयांनी बळजबरी लावले लग्न
इंदूरची एमबीएची विद्यार्थीनी प्रिती (नाव बदलले आहे) आणि बांगलादेशची राजधानी ढाका येथील जीनत यांची 2012 मध्ये फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर दोघी मोबाईलवर अनेक तास बोलायच्या. हळहळू मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. जीनतचे वडील प्रसिद्ध व्यापारी आहेत. घरदार सोडून ती 2013 मध्ये इंदूरला आली. प्रीतिच्या घरच्यांना याची माहिती मिळाली. त्यावर तोडगा काढण्यासाठी कुटुंबीयांनी प्रितीचे लग्न पक्के केले.
गोव्याला गेले हनिमुनला
एप्रिल 2015 मध्ये कुटुबीयांनी प्रितीचे प्रिंटिंग प्रेसचे काम करणारे महेश यांच्यासोबत लग्न लावून दिले. लग्नानंतर तिने महेशला गोव्याला जाण्यासाठी गळ घातली. तसेच सोबत जीनतलाही घेऊन जाऊ असा आग्रह केला. महेशने प्रितीला होकार दिला. जीनतला सोबत घेतले. गोव्याला गेल्यावर दोघींनी महेशला एका खोलीत कोंडले. दोघीच गोवा फिरायला गेल्या. त्यावर महेशने तक्रार केली. तेव्हा दोघी महेशला सोडून पळून गेल्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, दोघींचे सोबतचे फोटो... दोघींचे एकमेकींवर अतोनात प्रेम आहे....
बातम्या आणखी आहेत...