आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणी म्हणाली- 4 वर्षे रेप केला; हे फोटो घेऊन पोलिसांत पोहोचला आरोपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेपच्या आरोपी तरुणाने एसपींना लग्नाचे फोटो दाखवले. - Divya Marathi
रेपच्या आरोपी तरुणाने एसपींना लग्नाचे फोटो दाखवले.

इंदूर - उज्जैन महिला पोलिस स्टेशनमध्ये तीन दिवसांपूर्वी ज्या तरुणाविरुद्ध लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून 4 वर्षांपर्यंत बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता, तो तरुण स्वत: एसपी ऑफिसमध्ये आला. त्याने एसपींना अर्ज देत म्हटले की, त्या तरुणीसह तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नव्हता, तर तीन वर्षांपूर्वी मित्रांच्या उपस्थितीत अग्निसमोर सात फेरे घेऊन प्रेमविवाह केला होता. पुरावा म्हणून त्याने लग्नाचे फोटो आणि स्टँप एसपींसमोर सादर केले.

 

असे आहे प्रकरण...
- रामजी की गलीजवळ राहणाऱ्या तरुणीने काही दिवसांपूर्वी महिला पोलिसांत पोहोचून सखीपुरा येथे राहणाऱ्या मोहितविरुद्ध 4 वर्षे लग्नाशिवाय ठेवणे आणि लग्नाचे विचारल्यावर मारहाण करून घराबाहेर हाकलल्याचा आरोप केला होता. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता.

- केस दाखल होताच तरुण स्वत:हून पोलिसांत दाखल झाला. त्याने आपल्या अर्जात लिहिले की, पत्नीच्या माहेरचे लग्नाच्या विरोधात होते. त्यांनी अनेक वेळा धमकी दिली होती की, तिला परत घेऊन जाऊ. पत्नीही त्यांच्या बोलण्याला भुलली आणि लग्नानंतर छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडणे करायला लागली. घरातील कलहात माहेरच्यांनी हस्तक्षेप केल्याने पत्नीने बलात्काराची केस दाखल केली आहे. आम्हाला 2 वर्षांची मुलगीही आहे.

 

काय म्हणतात पोलिस?
- महिला पोलिस स्टेशनच्या टीआय रेखा वर्मा म्हणाल्या, तीन दिवसांपूर्वी महिलेने मोहितविरुद्ध तक्रार दिली होती. यामुळे मोहितला फोन करून पोलिस स्टेशनला बोलावले होते, परंतु त्याने यायला नकार दिला. त्याला संबंधित महिला तुझी कोण लागते अशी विचारणा केल्यावर त्याने तेव्हाही आमचे काहीही नाते नाही, आम्ही लग्न केलेले नाही, असे उत्तर दिले होते. दोन दिवस वाट पाहिल्यानंतर महिला आणि तिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपीने आपल्या वकिलासह लग्नाचे पुरावे सादर केले आहेत. यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. जे पुरावे मोहितने दिले आहेत, त्यांचा तपास केल्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. महिलेसह चार जण आले होते, त्यांनी साक्षीदार म्हणून जबाब दिला होता की, लग्न झालेले नाही. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...