आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MURDER: चुलत दिराशी जुळले प्रेम, पत्नीने प्रेमीसोबत मिळून केली पतीची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- एका महिलेने चुलत दिराच्या मदतीने चक्क पतीचीच हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या महिलेचे चुलत दिरावर प्रेम होते. पतीचा मृतदेह त्याच्याच खोलीत आढळून आला होता. पोलिस तक्रारीत एवढेच म्हटले होते, की मृत्यू सामान्य नाही. पण केवळ जवळच्या लोकांना मृत्यूमागचे कारण माहित होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर हत्येचे प्रकरण नोंदविण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात महिला आणि चुलत दिराचे प्रेमप्रकरण उजेडात आले. दोघेच या हत्येला जबाबदार असल्याचे पुरावे मिळाले.
पोलिसांना रामरतन कुशवाह यांचा मृतदेह 30 जानेवारी रोजी आढळून आला होता. यावेळी त्यांचा भाऊ भगवान याने हत्येची शंका व्यक्त केली होती. पोलिसांनाही रामरतन यांच्या मानेवर काही जखमा आढळून आल्या होत्या. त्यानंतर आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालात हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना ललिताबाई आणि लखन याचे प्रेमप्रकरण असल्याचे समजले. तपासाची चक्रे फिरली आणि दोघांना अटक करण्यात आली.
एका सार्वजनिक विवाह प्रसंगी रामरतन आणि ललिताबाई यांचे लग्न झाले होते. पण दोघांमध्ये वयाचे बरेच अंतर होते. लखन हा रामरतन यांच्या घरीच राहत होता. लखन आणि ललिताबाई यांचे वय जवळपास सारखेच होते. दोघांमध्ये लगेच प्रेम जमले. त्याचे रुपांतर संबंधांमध्ये झाले. त्यानंतर रामरतन याचा काटा काढण्याचे ठरवले.
एके दिवशी रात्री रामरतन घरी झोपला होता. तेव्हा ललिताबाईने त्याचे हात पाय पकडले. लखनने त्याची मान दाबली. जरा वेळाने रामरतनचा मृत्यू झाला.
खूनानंतर केली अंघोळ
पतीचा खून केल्यानंतर ललिताबाईने अंघोळ केली. मृतदेहाला भेट दिल्यावर अंघोळ करण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे तिने अंघोळ केली.
पुढील स्लाईडवर बघा, ललिताबाईचे फोटो...