आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फासावर लटकलेली होती पोलिसाची पत्नी, सालीने सांगितले भावजीचे सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हर्षिलाचा मृतदेह असा खोलीत लटकलेला होता. - Divya Marathi
हर्षिलाचा मृतदेह असा खोलीत लटकलेला होता.
इंदूर - झाबुआच्या एलआयसी कॉलनीमध्ये शनिवारी एका महिलेने पंख्याला लटकून गळफास घेतला. मृत हर्षिला डामोर एका कॉल सेंटरमध्ये एक्झिक्युटिव्ह होती, तर तिचा पती नीलेश इंदूरमध्ये प्लाटून कमांडर आहे. हर्षिलाची बहीण विनिलाने तिचा पती नीलेशवर खळबळजनक आरोप केले आहेत. विनीला म्हणाली- त्याचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध आहेत, यामुळे तो हर्षिलाचा छळ करत होता. विनीलाने सांगितले, तो तिला मोबाइल अन् फेसबुक वापरू देत नव्हता.
 
असे आहे प्रकरण...
इंदूरमध्ये राहणारे नीलेश आणि हर्षिला काही दिवसांपूर्वीच आपल्या गावी झाबुआला गेले होते. शनिवारी हर्षिलाने गळफास घेतला. तिचे नातेवाइक म्हणाले की, पतीच्या अवैध संबंधांमुळे ती परेशान होती. दोघांत नेहमी यावरून भांडणे व्हायची. शुक्रवारी रात्रीही त्यांच्यात यावरून वाद झाला. नीलेश आणि हर्षिलाचे लग्न 10 वर्षांपूर्वी झाले होते आणि दोघांना 2 मुलेही आहेत.
- 31 ऑक्टोबर रोजी हर्षिलाने इंदूर महिला पोलिसांत याबाबत तक्रार नोंदवली होती की, तिला पतीकडून जिवाला धोका आहे. हर्षिलाच्या मृत्यूबाबत कळताच तिचे वडील विनय, आई ज्योत्स्ना, मोठी बहीण विनीला आणि इतर नातेवाइकांनी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात विनीलाने आरोप केला की, तिच्या मोठ्या बहिणीने आत्महत्या केली नाही तर तिचा खून झाला आहे. तिचा पती नीलेश आणि इंदूरच्या एका खासगी बँकेत काम करणाऱ्या महिलेमध्ये अवैध संबंध आहेत. यामुळे तो हर्षिलाला सारखा त्रास देत होता.
- विनीला म्हणाली, शुक्रवारी रात्री नीलेशने हर्षिलाशी पुन्हा भांडण केले. रात्री साडे 12 वाजता हर्षिलाने तिच्या वडिलांना फोन करून घरी या म्हणाली. एसआय जोरावरसिंह सिसौदिया म्हणाले की, पती नीलेशने सांगितले की शुक्रवारी रात्री तो दारू प्यायला होता. यावरूनच दोघांत भांडण झाले. यानंतर ती खोलीत गेली आणि तिने गळफास लावला. पीएमनंतर माहेरच्यांनी तिचा मृतदेह नेला. त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली. तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...