उज्जैन (इंदूर) - प्रियकराच्या मदतीने पतीवर गोळ्या चालवून पती-पत्नीच्या नात्याचा खून करण्याचीच शहरात सध्या चर्चा सुरु आहे. मनीष मीणा हत्याकांडात सोमवारी मोठा खुलासा झाला. जी पत्नी पतीच्या मारेकऱ्यांचा शोध घ्या, यासाठी घटनेच्या तिसऱ्या दिवशी पोलिस स्टेशन समोर निदर्शने करत होती तिनेच मित्राच्या मदतीने हत्याकांड घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे.
मनीष मीणाच्या कुटुंबीयांनी जेव्हा त्याच्या रुमची पाहाणी केली तेव्हा तिथे टीव्ही आणि कपड्यांशिवाय काहीही सापडले नाही, हे पाहून त्यांना धक्का बसला. कपाटातील तीन ते चार लाख रुपये रोख आणि लाखो रुपयांचे दागिणे , लॅपटॉप, महत्त्वाच्या फाइल, एटीएम कार्ड सर्वकाही घरातून गायब होते. कुटुंबियांनी याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे, की जेव्हा मनीष हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाची लढाई लढत होता तेव्हा त्याची पत्नी मिनाक्षी प्रियकर हनीफसोबत पैसे आणि दागिण्यांची विल्हेवाट लावण्यात व्यस्त होती.
काय आहे प्रकरण
18 ऑगस्ट रोजी मनीष मीणाची गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कित्येक दिवस त्याच्या मारेकऱ्यांचा तपास करत असलेल्या पोलिसांना त्याची पत्नी मिनाक्षीवर तसूभरही संशय आला नाही. कारण हत्येनंतर तिसऱ्या दिवशी तिने मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस स्टेशनसमोर आंदोलन केले होते. तपासात पोलिसांचा हनीफवर संशय बळावला. 25 ऑगस्ट रोजी जेव्हा पोलिस मिनाक्षीच्या एनजीओमध्ये चौकशीसाठी गेले तेव्हा कार्यालयात स्टाफसोबत हनीफही हजर होता. पोलिसांना पाहाताच त्याने मोबाइलमधील सिम आणि मेमरी कार्ड काढून तोंडात लपवण्याचा प्रयत्न केला. हे पोलिसांच्या नजरेतून सुटले नाही. पोलिसांनी त्याला त्याचवेळी ताब्यात घेतले आणि सिम व मेमरी कार्ड जप्त केले.
मिनाक्षी म्हणाली - हनिफसोबतची मैत्री पतीच्या जीवावर उठेल हे माहित असते तर त्याची साथ सोडली असती
सोमवारी पोलिसांनी मिनाक्षीची बंदद्वार चौकशी केली. तीन तासांच्या चौकशीत ती ओक्साबोक्शी रडत होती. तिने पोलिसांना म्हटले, की ज्याच्यावर मी प्रेम करत होते त्याची हत्या कशी करेल. मला जर माहित असते की हनिफसोबतची मैत्री पतीच्या मृत्यूचे कारण ठरेल तर मी त्याची साथ आधीच सोडली असती. पोलिसांनी सांगितल्यानूसार मिनाक्षी पोलिस कोठडीत रात्रभर बेचैन होती. प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करणाऱ्या मिनाक्षीचे तोंड पाहाण्याची इच्छा नसल्याचे तिच्या सासरच्यांचे म्हणणे आहे. त्यांना तिने केलेल्या कृत्यावर विश्वास बसत नाही. एक स्त्री दुहेरी आयुष्य कसे जगू शकते याचाच ते विचार करत आहेत.
हनिफचे छायाचित्र प्रदर्शित झाल्यानंतर मनीष राहात असलेल्या भागातील लोकांनीही म्हटले आहे, की तो मिनाक्षीसोबत कायम घरी येत होता. मनीषच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे, की गोळ्या लागल्यानंतर मनीषवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते तेव्हा घर मिनाक्षीच्या ताब्यात होते. आम्हाला किंचतीही शंका आली नाही की या खूनात तिचा हात असेल. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते आणि अजून त्यांना मुलबाळही झालेले नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हनिफसोबत मिनाक्षी आणि इतर आरोपी