आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wife Surrender In Seniors For Promotions At Bhopal

पदोन्नतीसाठी पतीने स्वत:च्या पत्नीलाच केली अधिकार्‍यांच्या हवाली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- पदोन्नती मिळवण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हवाली केल्याचा आरोप पत्नीने तिच्या पतीवर केला, परंतु पतीने ती सिझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितले. भोपाळच्या अ‍ॅपेक्स बँकेतील कर्मचार्‍याशी संबंधित ही घटना आहे.

पोलिसांनी महिलेच्या पतीसोबत इतर सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे. महिलेचा आरोप आहे की, 2000 मध्ये त्यांचे लग्न झाले, परंतु लग्नापासूनच पती तिच्याशी अनैसर्गिक कृत्य तसेच मारहाण करायचा. काही दिवसांनंतर त्याने त्याच्या मित्रांसोबत मिळून सामूहिक अत्याचार केला. दुधात मादक पदार्थ खायला दिले जायचे. असा प्रकार अनेक वर्षे सुरू होता. मादक पदार्थांच्या सेवनामुळे ती तणावग्रस्त होती. महिलेने जेव्हा पतीला यासाठी विरोध केला तेव्हा त्याने दोन्ही मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली.

महिलेने आरोप केला आहे की, 2012 मध्ये तिच्या पतीने पदोन्नती मिळण्यासाठी त्याचे विधी सल्लागार ओम पाटीदार, शिवपाल, सुनील आणि अजय यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. परंतु पतीने तिचे सर्व आरोप फेटाळले आहेत. ती सिझोफ्रेनिया (तणावाचे पुढील स्तर) रोगाने पीडित आहे. इंदूरचे डॉ. दीपक मंशारमानी यांच्याकडे मागील तीन वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे पतीचे म्हणणे आहे.