आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री भावाला फोनवर म्हणाली, मला इथून ताबडतोब घेऊन जा... सकाळी झाले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिकाने मृत्यूआधी भावाला फोन करून मारहाणीची माहिती दिली होती. - Divya Marathi
दीपिकाने मृत्यूआधी भावाला फोन करून मारहाणीची माहिती दिली होती.
इंदूर - द्वारकापुरी परिसरातील एका विवाहितेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मध्यरात्री तिने आपल्या भावाला फोनवर आपले दु:ख सांगत येथून घेऊन जाण्याविषयी सांगितले होते. सकाळी भाऊ येण्याआधीच बहिणीच्या मृत्यूची बातमी धडकली. विवाहितेच्या माहेरच्यांनी तिचा नवरा आणि सासूवर खुनाचा आरोप ठेवला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
 
असे आहे प्रकरण...
- पोलिस सूत्रांनुसार, मृत दीपिकाचे मयंक शर्माशी लग्न झाले होते. मयंक म्हणाला की, सकाळी मी झोपेतून उठल्यावर दीपिका फासावर लटकल्याचे दिसले. हे पाहून मी तत्काळ घरच्यांना बोलावले आणि दीपिकाच्या भावाला फोनवर माहिती दिली. आम्ही सगळे तिला घेऊन हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांनी तिथे तिला तपासून मृत घोषित केले.
- दीपिकाच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या माहेरचे हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मृत विवाहितेचा भाऊ महेंद्र म्हणाला की, तिचा नवरा आणि सासरचे नेहमी दीपिकाला त्रास देत होते. त्यांच्या मारहाणीने त्रस्त होऊन काही दिवसांपूर्वीच ती माहेरात आली होती. नंतर तिच्या सासरच्यांनी माफी मागून पुन्हा असे करणार नाही म्हणून तिला परत घेऊन गेले.
- मुलीच्या मृत्यूनंतर तिची आई आणि इतर महिला खूप आक्रोशित झाल्या. दीपिकाचे पोस्टमॉर्टम सुरू होते तेव्हा अचानक तिच्या सासरचे समोर आल्यावर माहेरच्या माणसांचा संयम सुटला आणि ते त्यांच्यावर तुटून पडले. तिथे आलेल्या पोलिसांनी त्यांना कसेबसे शांत केले.
 
भय्या, या लोकांनी मला खूप मारले, कानातून रक्त निघतंय...
- भाऊ महेंद्र म्हणाला की, बहिणीला तिच्या सासरचे खूप मारत होते. ती त्यांच्या जाचामुळे खूप त्रासली होती. तिने रात्री 12 वाजता मला फोन करून म्हटले की, हे लोक मला खूप मारत आहेत. माझ्या कानातून रक्त निघतेय, हातही तोडलाय. हे ऐकून माझ्या आजीने दुसऱ्या दिवशी तिला घ्यायला सांगितले होते, पण सकाळी 8.20 वाजता भावजीने फोन करून तिने फाशी घेतल्याची माहिती दिली. भाऊ महेंद्रने दीपिकाचा नवरा आणि सासूविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...