आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’ महिला दिनाचे विजेते जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - महिला दिनानिमित्त दैनिक भास्कर समूहाच्या वतीने महिला वाचकांसाठी आयोजित स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. महिला फोटोग्राफी कॉन्टेस्ट आणि सर्वोत्कृष्ट संदेश स्पर्धेस महिला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता.फोटोग्राफी कॉन्टेस्टच्या दोन विभागांत पाच हजारांहून अधिक छायाचित्रे मिळाली. स्पर्धेत दोन विभाग करण्यात आले होते. कॉस्च्युम आणि सेलिब्रेशन. परीक्षकांच्या समितीने प्रत्येक विभागामध्ये अव्वल 55 विजेत्यांची निवड केली. या सर्व विजेत्यांना लवकरच आकर्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतील.


सर्वोत्कृष्ट संदेश स्पर्धेत महिला स्पर्धकांनी महिला दिनानिमित्त असंख्य संदेश पाठवले. परीक्षकांनी यातील सर्वोत्कृष्ट पाच संदेशांची निवड केली.


वुमन फोटोग्राफीतील 5 विजेते (कॉस्च्युम श्रेणी)
रेश्मी गोल्या (भोपाळ), निधी रस्तोगी (भोपाळ), धरती श्याम गांधी (भावनगर), श्रद्धा श्रोती (भोपाळ), मुक्ता (अकोला)
सेलिब्रेशन श्रेणी : इंदू बिर्ला (रांची), प्रिन्सी शाह (अहमदाबाद), संगीता घुले (कल्याण महाराष्ट्र), शोभना ढोलकीय (सेवरी महाराष्ट्र), स्वाती गोयल (अजमेर, राजस्थान)


सर्वोत्कृष्ट 5 संदेश व विजेत्या :
महिला देश की जान है । परिवान की शान है। गहरा उसका ग्यान है । पुरुषों का अभिमान है।
- क्रांती प्रदीप तलवारे, नाशिक.
हुंदका असा तिचा ओठी दाटून येतो, अन् आसवांचे मोती ओंजळीत घेतो... दाटलेल्या हुंदक्यात असते भूतकाळाची लाट, डोळ्यात तिच्या असते उज्ज्वल भवितव्याची पहाट...
- अमिता किशोर सोनोगना, औरंगाबाद.
Women are the real architect of society.
- मोहिनी प्रवीण लोदया, जळगाव.
ज्या देशाची भक्कम महिला, तो देश विकासात पहिला.
वर्षा दंगवाहळ, नाशिक
करू नका माझी गर्भात हत्या. कदाचित असेल हाती माझ्या उद्याची सत्ता. होईन ‘सावित्री’, होईन ‘इंदिरा’. होऊन किरण सूर्याचा घेईन भरारी ‘कल्पनाच्या’ अवकाशात.
- माधुरी केदारमुंडळे, नाशिक