आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरीचा श्रृंगार करून आईनेच केली चिमुरडीची हत्या, ‍तिचा मृतदेह कमरेला बांधून घेतला गळफास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- मध्यप्रदेशतील इंदूर शहरात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मनोरुग्ण महिलेने पोटच्या मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह कमरेला बांधून स्वत: आत्महत्या केली आहे. ‍निर्मला (28) असे मृत महिलेचे नाव असून अंशिका (4) असे चिमुरडीचे नाव आहे.

निर्मलाने महिलेने नवरीचा श्रृंगार केला. लाल साडी परिधान केली. नंतर तिने अंशिकालाही सजवले. नंतर तिचा गळा आवळून तिची हत्या केली. ओढणीने तिचा मृतदेह आपल्या कमरेला बांधले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना घडली तेव्हा महिलेचा पती ऑफिसला गेला होता. तो सायंकाळी घरी आल्यानंतर त्याला हा प्रकार निदर्शनास आला.

- राऊ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अशोका विहार कॉलनीत बुधवारी सायंकाळी घडली. 
- कॉलनीतील रहिवासी सहदेव रावत सायंकाळी 6.30 वाजता घरी पोहोचले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. 
- दरवाज्याची कडी वाजवली असता, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. सहदेवने दरवाजा तोडला अडता त्याची पत्नी निर्मलाने गळफास घेतला होता. अंशिकाचा मृतदेह निर्मलाच्या कमरेला बांधलेला होता.
- सहदेव आणि निर्मलाचा विवाह 13 मे 2011 रोजी झाला होता. दोघांमध्ये चांगले जमत होते. 
- सहदेव राऊ येथील रिझनल फॉरेंसिक सायन्स लॅबमध्ये टेक्निशियन आहे.

मानसिक आजाराने त्रस्त होती निर्मला... 
- निर्मलाने मानसिक आजाराने त्रस्त होती. आजाराला कंटाळून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...