आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman MLA Organised Press Conference To Search For Dog

महिला आमदाराने श्वान हरवल्याची घेतली प्रेस कॉन्फरन्स, श्वान शोधण्याचे मीडियाला आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाब्रा (ग्वाल्हेर)- उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आझम खान यांच्या म्हशी चोरीला गेल्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना शोध मोहिमेवर लावण्यात आले होते. त्यावेळी याची खुप चर्चा झाली होती. पण आता मध्य प्रदेशातील या महिला आमदाराने आझम खान यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. तिचे श्वान हरवले असून ते शोधण्यासाठी पोलिस विभागाला वेठिस धरण्यात आले आहे. एवढे नव्हे तर या महिला आमदाराने प्रेस कॉन्फरन्स घेऊन श्वानाला शोधण्याचे मीडियावर आवाहन केले आहे.
मध्य प्रदेशची महिला आमदार इमरतीदेवी हिचा लॅब्रेडॉर श्वान हरवलाय. त्याचा अजून पत्ता लागलेला नाही. तो घरीही परतलेला नाही. त्याचा बराच शोध घेण्यात आला. पण काहीही माहिती मिळालेली नाही. तो बेपत्ता झाला असल्याचा संशय आहे. ही घटना या महिला आमदाराने एवढी मनाला लावून घेतली आहे, की ती सतत हमसून हमसून रडत आहे. लोकांसमोरही तिच्या डोळ्यांत अश्रू दिसून येतात.
श्वानाबद्दल असलेल्या प्रेमाचे पशूप्रेमिंनी कौतूक केले आहे. पण ती एवढ्यावरच थांबलेली नाही. तिने प्रेस कॉन्फरन्स आयोजित करुन मीडियाच्या माध्यमातून लोकांना श्वान शोधण्याचे आवाहन केले आहे.
लोकप्रतिनिधींनी जनतेला भेडसावणाऱ्या विषयांवर प्रेस कॉन्फरन्स सारखा पर्याय निवडण्याचा प्रघात आहे. पण श्वानाला शोधण्याची प्रेस कॉन्फरन्स आयोजित केल्याची ही घटना पहिल्यांदाच घडली असावी.
पुढील स्लाईडवर बघा, या इम्रती या महिला आमदाराच्या डोळ्यांत कसे उभे राहिले अश्रू....