आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेबर पेनमधील गर्भवती महिलेसाठी कॉन्स्टेबल झाली नर्स, रस्त्यावर पार पाडली डिलिव्हरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- लेबर पेनने त्रस्त असलेल्या महिलेसाठी एका महिला पोलिस कॉन्स्टेबलने भर रस्त्यावर नर्सची भूमिका पार पाडली. ग्वाल्हेरच्या पोलिस आयुक्तांनी या महिलेचे कौतुक केले असून अवॉर्ड देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे डिलिव्हरीनंतर गर्भवती महिला आणि तिचे बाळ अगदी सुखरुप आहे.
अशी घडली घटना
महाराजबाडा परिसरात पोलिस कॉन्स्टेबल गुलाब ड्युटीवर होती. यावेळी तिला रस्त्यावर एक महिला लेबर पेनने त्रस्त असल्याचे दिसून आले. ती लगेच तिच्याजवळ गेली. तिने उपस्थित लोकांच्या मदतीने चौकातच पडदा बांधला. डिलिव्हरीची तयारी केली. जरा वेळाने महिलेने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने बाळासाठी दुध मागवले. काही वेळाने येथे अॅम्बुलंसही दाखल झाली. महिला आणि तिच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
गर्भवती महिला कचरा वेचून घर सांभाळते. तिचा नवरा दारुडा आहे. कचरा वेचत असताना तिला लेबर पेन झाले होते. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला ती वेदनेने त्रस्त होती. या अगदी महत्त्वाच्या क्षणी गुलाबने तिची मदत केली.
पुढील स्लाईडवर बघा, गुलाब आणि बाळाचा फोटो....
बातम्या आणखी आहेत...