आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिमा मलीन झाल्याने 21 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; सुसाइडमधून केला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- बाणगंगा परिसरातील शिवकंठ नगरात राहाणार्‍या एका 21 वर्षीय विवाहितेने सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. रानू सोलंकी, असे या महिलेचे नाव असून तिला एक मुलगी आहे.

'त्याने मला खूप त्रास दिला आहे. माझी बदनामी केली आहे. यामुळे झाली प्रतिमा मलीन झाल्याने मी आत्महत्या करत आहे.', असे रानूने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. तिने एका युवकावर विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.

जाणून घ्या काय आहे हे प्रकरण?
- बाणगंगा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवकंठ नगरात राहाणारी रानू सोलंकी हिने सोमवारी रात्री राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
- तिला शेजारी राहाणार्‍या काही लोकांना अरविंदो हॉस्पिटलमध्ये हलवले. पण, खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
- पोलिसांना रानूच्या घरात एक सुसाइड नोट सापडली आहे. त्यात तिने आत्महत्येचा खुलासा केला आहे

'त्याने मला बदनाम केले, आता त्याची पाळी आहे'
- सुसाइड नोटमध्ये रानूने एका युवकाचा खुलासा केला आहे. त्याचे नाव प्रदीप नरवरिया आहे. 'प्रदीपने माझी प्रतिमा मलीन केली आहे. त्याने मला बदनाम केले आहे', असे रानूने सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.
- 'त्याने मला खूप त्रास दिला आहे. त्याता त्याची पाळी आहे.', असे रानूने सुसाइड नोटमध्येे लिहिले आहे.
- रानूने आईसाठी लिहिले की, मजबूरीत मला टोकाचे पाऊल उचलावे लागले. भावांसाठी लिहिले की, आई आणि माझ्या मुलीची काळजी घ्या.

व्हॉट्सअॅपवर सापडले संभाषण...
- पोलिसांनी सांगितले की, रानूचा मोबाइल तपासून पाहिला असता, व्हॉट्‍सअॅपवर ती एका युवकासोबत संभाषण करत होती.
- या युवकाने रानूसोबत विवाह करण्यास स्पष्ट नकार ‍दिला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रानू सोलंकीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...