आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसाइड CCTVमध्ये कैद, चिमुकलीला सोडून आईने तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. - Divya Marathi
संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
भोपाळ - डीबी सिटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून सोमवारी दुपारी कापड व्यापाऱ्याच्या पत्नीने जीव दिला. महिलेसोबत तिची 6 वर्षांची मुलगी होती, ती मॉलमधील गेम झोनमध्ये खेळत होती. कुणाशी तरी फोनवर बोलून तिने फोन बॅगमध्ये ठेवला आणि तब्बल 35 फूट खली ग्राउंड फ्लोअरवर उडी मारली. तिने असे का केले याचा अद्याप खुलासा झालेला नाही.
फोन बॅगमध्ये ठेवून मारली उडी
- चुडीबाजार, लखेरापुराचे रहिवासी संजय मित्तल कापड व्यापारी आहेत. ग्राउंड फ्लोअरवर त्यांची दुकान आहे. पूर्ण कुटुंब पहिल्या मजल्यावर राहते. संजय यांची 32 वर्षीय पत्नी रेणुका गृहिणी आहे. सोमवारी दुपारी त्या 6 वर्षांच्या मुलीला घेऊन आपल्या स्कूटरवरून डीबी सिटीमध्ये आल्या. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या गेम झोनमध्ये मुलीला काही वेळ खाऊ घातले.  मग मुलीला म्हटले की, तू इथेच थोडा वेळ खेळ, मी थोड्या वेळाने येते. यानंतर फोनवर बोलताना ती टीडीएस गेटवर आली. येथे काही वेळ फोनवर कुणाशी तरी बोलून नंतर तिने फोन आपल्या बॅगमध्ये ठेवला. 
- संध्याकाळी 4 वाजता 35 फुटांवरून ग्राउंड फ्लोअरवर उडी मारली. स्टाफने त्यांना लगेच रुग्णालयात पोहोचवले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नर्मदा ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आले. येथे एक तास चाललेल्या इलाजानंतर रेणुका यांचे निधन झाले.
 
कॅमेऱ्यात कैद झाली घटना
महिलेने आत्महत्या करण्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यात रेणुका कुणाशीतरी फोनवर बोलताना दिसत आहेत. यानंतर त्यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. घटनेची माहिती मॉलमधील महिला स्टाफने दिली, तोपर्यंत रेणुकाने उडी मारलेली होती. डीबी सिटी प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज एमपीनगर पोलिसांना उपलब्ध केले. हे पाहिल्यानंतर आत्महत्येचा खुलासा झाला. याआधी पोलिस याला अपघात मानत होते.
 
पती-पत्नीत नव्हता कोणताही वाद
- रेणुकाचे वडील डॉ. प्रल्हाददास अग्रवाल गुजरातच्या कांडलाचे मूळ रहिवासी आहेत. 12 वर्षांपूर्वी रेणुका आणि संजयचे लग्न झाले होते. त्यांना 11 वर्षांची आणि 6 वर्षीय दोन मुली आहेत. मोठी मुलगी दुपारी ट्यूशनला गेली होती. तर लहान मुलगी डीबी सिटीला घेऊन जाण्याचा आग्रह करू लागली. संजय यांचे मित्र अजित अग्रवाल म्हणाले की, संजय आणि रेणुकामध्ये कधीच वाद झाला नाही. दोघेही एकमेकांना समजणारे होते. याशिवाय रेणुका स्वत: पूर्ण कुटुंबाची चांगली देखभाल करायची.
 
कुटुंबाने सांगितले हा अपघात आहे...
- पोलिसांना दिलेल्या जबाबात रेणुका आणि संजयच्या कुटुंबाने याला अपघात असल्याचे सांगितले आहे. तथापि, टीआय संजयसिंह बैस यांच्या मते, हे प्रकरण आत्महत्येचे आहे. रेणुका कुणाशी तरी बोलत होती आणि त्यांनी हे पाऊल का उचलले याचा खुलासा कुटुंबाच्या सविस्तर जबाबानेच होऊ शकेल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...