आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहीतेने उचलले टोकाचे पाऊल; दोन चिमुरड्यासह स्वत:ला घेतले पेटवून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदिशा/भोपाळ- 26 वर्षीय एका विवाहीतेने आपल्या दोन चिमुरड्यासह स्वत:च्या अंगावर केरोसिन घेऊन बंद खोलीत पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. महिला आणि एका मुलाचा अक्षरश: कोळसा झाला तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील खजूरिया गावात ही घटना घडली.

पती करतो मोलमजुरी...
- मृत महिला सीमाचा पती चतरसिंह अहिरवार मोलमजुरी करतो.
- दुसरीकडे, सीमाच्या भावाने चतरसिंहसह तिच्या घरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. 2 लाख रुपयांसाठी चतरसिंह सीमा त्रास देत होता. सासरच्या त्रासाचा कंटाळून सीमाने टोकाचे पाऊल उचलून स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली.
- सागर जिल्ह्यातील माहेर असलेली सीमा आणि खजूरिया गावात राहाणारा चतरसिंहचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला होता.
- सीमाचे वडील प्रीतम सिंह रेल्वेत नोकरीला होते. ते सेवानिवृत्तीनंतर त्यांना 5 लाख रुपये मिळाले.
- मृत सीमाचा भाऊ राजेश अहिरवारने तिचा पती, सासरे चुन्नीलाल आणि जेठानी गुलाबविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. या तिघांच्या दबावामुळे सीमाने आत्महत्या केल्याचे राजेशने म्हटले आहे.

दोन्ही मृतदेहांचा अक्षरश: झाला होता कोळसा...
- घटनेची माहिती मिळताच तहसीलदार इसरार खान, ठाणे अंमलदार गजेंद्र सिंह जादौन यांच्यासह पोलिस घटनास्थळी पोहोचले.
- सीमा आणि तिच्या एका मुलाचा अक्षरश: जळून खाक झाले होते. त्याच्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी पठारी येथे आणण्यात आले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सीमाने स्वत: दोन्ही चिमुरड्यावर केरोसिन ओतून असे घेतले जाळून...
बातम्या आणखी आहेत...