आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरनेट वापरात गृहिणी आघाडीवर, आयएएमएआयचा अहवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - जर तुम्ही समजत असाल की, महिला घरगुती कामकाजात खूपच व्यस्त असतात, त्यांना मान वर काढायलाही वेळ मिळणार नाही इतके काम असते. त्यामुळे मोबाइल, इंटरनेटवर अपडेट व्हायला त्यांना सवडच नसते.. हा तुमचा गैरसमज आहे. अनलिमिटेड इंटरनेट वापर व विविध डाटा प्लॅनचा लाभ घेण्यात गृहिणीच आघाडीवर असतात. याबाबतीत त्यांनी कॉलेज स्टुडंट व नोकरी करणाऱ्या महिलांनाही मागे टाकले आहे. एका पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.

इंटरनेट अँड मोबाइल असाेसिएशन ऑफ इंडियाच्या (आयएएमएआय) ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली असून अनलिमिटेड डाटा वापरणाऱ्यांमध्ये गृहिणींची संख्या वेगाने वाढत असल्याचे त्यात म्हटले आहे. सासू -सुनेच्या गप्पा असोत की नव्या साड्या, ड्रेसेस, दागिन्यांची खरेदी अथवा नवीन रेसिपी, शॉपिंग ट्रेंड, हाऊसकीपिंग, रेसिपीचे फोटोज अपलोड करणे या बाबी महिलांच्या आवडीच्या ठरल्या आहेत. इंटरनेट तसेच सोशल साइटवरील नव्या मेसेंजर सुविधाही महिलांमध्ये लोकप्रिय आहेत.

सरासरी डाऊनलोड ८० एमबीवर पोहोचले
देशभरात इंटरनेटचा उपयोग वेगाने वाढत आहे. टेलिकॉम कंपन्याना उत्पन्नाच्या १७ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा हा इंटरनेटमधूनच येत आहे. वर्षभरापूर्वी हे प्रमाण १२ टक्के इतके होते. टेलिकॉम रेग्युलेटरीच्या (ट्राय) अहवालानुसार एक वर्षापूर्वी इंटरनेट कनेक्शनवर दरमहा डाऊनलोड ५० एमबी होता. तो वाढून ८० एमबीपर्यंत गेला आहे.
बातम्या आणखी आहेत...