आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलगर्ल पाठवून बनवला अश्लिल व्हिडिओ, 80 लाखांसाठी ब्लॅकमेलिंग, महिला मॅनेजरचा प्रताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - आरोपी तरुणी - Divya Marathi
फोटो - आरोपी तरुणी
इंदूर - एका बँक अधिकार्‍याचा अश्लिल व्हिडिओ तयार करून त्याला 80 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करण्याचा कट रचणार्‍या महिला मार्केटिंग मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेली ही मॅनेजर त्याच बँकेत काम करत होती, ज्याठिकाणी बँक अधिकारी नियुक्त होता. विशेष म्हणजे तिने एकटीनेच या सर्व प्रकारासाठी कट रचला होता. तिने कॉलगर्लला बोलावले आणि नंतर स्वतः त्या अधिकार्‍याचा व्हिडिओ तयार केला.
असा रचला कट
एएसपी विनय प्रकाश पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कट अटक करण्यात आलेली मार्केटिंग मॅनेजर स्वाती सूर्यवंशी हिने रचला होता. ती बँक अधिकार्‍याबरोबर प्रिया अग्रवाल किंवा भदौरिया बनून बोलायची. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार स्वातीने सर्वात आधी दोन चायनामेड मोबाइल विकत घेतले होते. त्यात व्हाइस मॉडरेशन सुविधा (आवाज बदलून बोलणे) होती. त्याद्वारे तीने बँक अधिकार्‍याशी मैत्री केली आणि मग प्रिया अग्रवाल नावाने मॅनेजरसोबत बोलली.
त्यानंतर कॉलगर्लसाठी इंटरनेटवर शोध सुरू झाला.
पाच हजार देऊन बोलावली कॉलगर्ल
आरोपी तरुणी बेवसाईटवर देण्यात आलेल्या नंबरवर भदौरिया नावाने पुरुषाचा आवाज काढून बोलली. पाच हजार रुपयांत तिला दीड तासात कॉलगर्ल मिळाली. तीने बँक अधिकार्‍याला आपले नाव प्रिया सांगण्यास सांगितले. त्यानंतर ती स्वतः आधी खोलीत गेली आणि बॅगमध्ये छिद्र करून त्यात मोबाइलचा कॅमेरा सुरू करून मोबाईल ठेवला. तर दुसरा कॅमेरा कपाटाखाली लावला. नंतर जेव्हा अधिकारी आणि कॉलगर्ल तेथून गेली त्यावेळी तिने कॅमेर्‍याच्या रेकॉर्डींगची सीडी तयार केली. त्यानंतर तीने सीडी त्या अधिकार्‍याला पाठवली.

काही दिवसांनी अधिकार्‍याला कुरिअर बरोबर पत्र मिळाले. त्यात 80 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास अधिकार्‍याच्या पत्नीकडे सीडी पाठवण्याची धमकी देण्यात आली होती. काही दिवसांनी ते अधिकारी पोलिस महानिरीक्षक विपिन माहेश्वरी यांना भेटले आणि संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली.
आधी म्हटले चेहरा लावला
पोलिसांनी सांगितले की, पीडित अधिकार्‍याने आधी पोलिसांनाही खोटे सांगितले. कोणीतरी आपला चेहरा लावून खोटी सीडी लावल्याचा आरोप त्याने केला. पण व्हिडिओतील पेन आणि बूट पाहून पोलिसांना सत्य कळले. त्यानंतर अधिकार्‍याने सर्वकाही खरे सांगितले.

पुढे वाचा, पोलिसांनी कसा रचला सापळा