आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरा-जेठ-दीर करायचे 22 वर्षीय सुनेवर बलात्कार, पती-सासू द्यायचे साथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमझेरा (मध्यप्रदेश) - मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील अमझेरा भागात 22 वर्षीय सुनेवर सासरा, दीर आणि जेठ यांनी बलात्कार केला. यात महिलेचा पती आणि सासूने तिघांना मदत केली. जीवे मारण्याच्या धमकीने पीडित महिला आणि तिचे आई-वडील 10 दिवस जंगलात लपून बसले होते. मात्र, असे किती दिवस लपून बसणार असा विचार करुन महिलेच्या आई-वडिलांनी हिम्मत करुन पोलिस अधीक्षक राजेश हिंगणकर यांची भेट घेतली आणि मुलीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली. पोलिस अधीक्षकांनी संबंधीत पोलिस ठाण्याला गुन्हा दाखल करुन कारवाईचे आदेश दिले.

कुटुंबातील पुरुषांसोबत संबंध ठेवण्यासाठी पतीची बळजबरी
गेल्या वर्षी महिलेचा विवाह झाला. सुरुवातीपासूनच पती पत्नीला मारहाण आणि उठता-बसता शिवीगाळ करत होता. एवढेच नाही तर, कुटुंबातील पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी बळजबरी करत होता. लग्नानंतर दोन महिन्यातच महिला माहेरी परत आली होती. काही दिवसांनी पती तिला घ्यायला आला.

महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार, पती दिवस-रात्र मारहाण करत राहायचा आणि सासरा, दीर व जेठ तिच्यासोबत बळजबरी करत होते. या कुकर्मात सासू आणि पती देखील मदत करत असल्याचा महिलेचा आरोप आहे. या छळाला कंटाळून महिलेने एक दिवस सासरातून पळ काढला आणि आई-वडिलांकडे आली. सासरच्या मंडळीच्या भीतीने तिघेही दहा दिवस अंबाकुंडीच्या जंगलात लपून बसले. गुरुवारी पीडित महिलेच्या आई-वडिलांनी पोलिस अधीक्षक हिंगणकर यांच्याकडे न्यायाची मागणी केली. त्यांच्या आदेशानंतर संबंधीत ठाण्याने सासरा धारजी, दीर ककरिया, पती गोविंद आणि जेठ भमर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.