आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिजिटल वर्ल्डमध्ये तीन भाषांचे असेल वर्चस्व, त्यात हिंदीचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - भारतात जवळपास 32 वर्षांनी होत असलेल्या 10 व्या विश्व हिंदी साहित्य संमेलानासाठी मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ सजले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. ते सकाळी 9.35 वाजता ते दिल्लीहून भोपाळमध्ये आले होते. विमानतळावर मोजक्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. 400 खासदारांचा पक्ष 40 चा झाला आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून अजून सावरलेली नाही असा टोला त्यांनी लगावला.
पंतप्रधान म्हणाले - मला हिंदी आली नसती तर..
विश्व हिंदी साहित्य संमेलनाच्या उदघाटनपर भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येणाऱ्या काळात हिंदीसाठी सुवर्ण काळ असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'डिजिटल युगात तीन भाषांचे वर्चस्व असेल. त्यात प्रथम क्रमांकावर इंग्रजी, दुसरी चीनी आणि तिसऱ्या क्रमांकावर हिंदी भाषा असणार आहे.'

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रास्ताविकात मांडलेला भाषा संवर्धनाचा धागा पकडत पंतप्रधान मोदी म्हणाले, हिंदी भाषा संवर्धनाची गरज आहे. भाषा जेव्हा अस्तित्वात असते तेव्हा तिच्यावर होणाऱ्या आघातांची आपल्याला जाणिव होत नाही.

भाषा लुप्त झाल्यानंतर आपल्याला त्याची कमतरता जाणवते. मग शिलालेखांवर संशोधन करुन त्या काळातील भाषा कशी होती यावर संशोधन केले जाते. आपल्याकडे संस्कृत भाषा होती त्यात ज्ञानाचा भंडार होता. मात्र आज ही भाषा फक्त पुस्तकांत पाहायला मिळते त्यामुळे हे भांडार आपल्याला आज उपलब्ध होत नाही. त्यामुळे हे भांडार येणाऱ्या पिढ्यांमध्ये संक्रमीत झाले पाहिजे. त्यासाठी पंतप्रधानांनी वेदांचे उदाहरण दिले. वेदांचे पठण आपल्या पूर्वजांनी केले आणि स्मृतीच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिले.
पंतप्रधान म्हणाले, 'माझी मातृभाषा गुजराती आहे. पण जर मला हिंदी भाषा बोलता आली नसती आणि समजली नसती तर काय झाले असते याची पूर्ण जाणिव आहे. मला देशातील सर्वांपर्यंत पोहोचताच आले नसते.'

भाषा चैतन्यदायी
भाषा मुक्त हवे सारखी असते. ज्या पिढीजवळून, ज्या परिसरातून ती जाईल तिचा गंध तिला मिळतो. भाषा चैतन्यदायी असल्याचे ते म्हणाले.
आपली भाषा समृद्ध कशी होईल याचा आपल्याकडे निरंतर विचार झाला पाहिजे. देशातील इतर भाषिकांसोबत हिंदीची कार्यशाळा आयोजित करुन त्या भाषेतील शब्द हिंदीत कसे आणता येईल यासंबंधी विचार झाला पाहिजे.
न्यायालय - विज्ञान तंत्रज्ञानात हिंदीचा वापर वाढला पाहिजे - सुषमा स्वराज
32 वर्षांनंतर भारतात होत असलेल्या या संमेलनाचा उद्देश हिंदी भाषा संवर्धन आणि वृद्धी असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रास्ताविकात सांगितले. त्या म्हणाल्या, 'इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे हिंदीच्या संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. परराष्ट्र व्यवहार, न्यायालय, विज्ञान-तंत्रज्ञानात हिंदीचा वापर वाढला पाहिजे. त्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना करण्याची गरज आहे.'
पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राजाभोज विमानतळापासून कार्यक्रम स्थळ लालपरेड मैदानापर्यंत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक वाहनांची चौकशी होत असून प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जात आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात एसपीजी कमांडो एक आठवड्यापासून भोपाळमध्ये डेरेदाखल झाले आहेत.
विश्व हिंदी संमेलनाच्या उदघाटनानंतर दुपारी 12 वाजता पंतप्रधान दिल्लीला रवाना होतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 12 सप्टेंबर पर्यंत हा साहित्यीक सोहळा चालणार आहे. यात 39 देशांचे साहित्यीक सहभागी होतील. शेवट केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत होणार आहे.

विश्व हिंदी संमेलनाची सुरुवात महाराष्ट्रातून
विश्व हिंदी साहित्य संमेलन हे हिंदी भाषेचे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय संमेलन आहे. यात जगातील हिंदी विद्वान, साहित्यीक, पत्रकार, भाषातज्ज्ञ आणि हिंदी भाषा प्रेमी सहभागी होतात. प्रत्येक चार वर्षांनी या संमेलनाचे आयोजन केले जाता. 1975 मध्ये या संमेलनाची सुरुवात झाली. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याला प्रोत्साहन दिले होते. वर्धा येथील विश्व हिंदी संमेलन राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या वतीने पहिले संमेलन महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये झाले होते.