आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Girl Blackmail Businessmen By Accusing Rape

घरी बोलवायची तरुणी, बलात्काराचा आरोप करुन करायची BLACKMAIL

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- व्यापाऱ्यांना घरी बोलवून बलात्कार केल्याचा आरोप करुन फसवणाऱ्या तीन सदस्यांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. यात एका तरुणीचा समावेश आहे. ही तरुणी गोड बोलून व्यापाऱ्यांना घरी बोलवायची. त्यानंतर त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करायची. घाबरलेल्या व्यापाऱ्यांकडून बक्कळ पैसे उकळायची.
यासंदर्भात व्यापारी प्रविण दांतरे यांनी तक्रार नोंदवली आहे. या तरुणीने प्रविण यांच्याशी गोड बोलून मैत्री केली. गाडीचे टायर बदलायचे आहे, असे कारण सांगून त्यांना घरी बोलविले. प्रविण तरुणीच्या घरी गेले तर तेथे आधीच चौघे उपस्थित होते. त्यातील एकाने ही तरुणी माझी पत्नीच असल्याचे सांगितले. प्रविण यांच्यावर बलात्काराचा आरोप करीत पैसे मागितले. प्रविण यांनी मित्राला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोघांनी पोलिस तक्रार दिली.
सहा व्यापाऱ्यांकडून लुटले पैसे
आरोपींनी सांगितले, की तरुणीच्या मदतीने आम्ही सहा व्यापाऱ्यांकडून पैसे लुटले. त्यानंतर पोलिसांनी सहा व्यापाऱ्यांची माहिती मिळाली. यातील एका व्यापाऱ्याने तक्रार दिली. परंतु, इतर व्यापारी तक्रार देण्यासाठी तयार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील स्लाईडवर बघा, हे आहेत आरोपी...