आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रागारागात सापाला चिरडले, निश्चिंत होऊन झोपी गेला तरुण; रात्री सापाने घेतला बदला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील 22 वर्षांच्या तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. विशेष हे की तरुणाला साप चावल्याचे लक्षातच आले नाही. झाले असे की तरुणाने साप पाहिला आणि त्याने त्याला चिरडले व झोपी गेला. मात्र रात्री अचानक त्याला अस्वस्थ वाटायला लागले आणि त्याचा मृत्यू झाला. चिरडून घराबाहेर फेकला होता साप...
सर्वप्रथम पत्नीने पाहिला होता साप
- बैतूल जिल्ह्यातील घोडाडोंगरी तालुक्यापासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर डुल्हारी गावात ही घटना घडली.
- मंगळवारी पहाटे-पहाटे तरुणाचा साप चावल्याने मृत्यू झाला.
- 22 वर्षीय छोटू त्याची पत्नी कमलासोबत घरात झोपलेला होता.
- रात्री 12 वाजता अचानक कमलाची झोपमोड झाली आणि तिने घरात साप पाहिला. तिने तिचा पती छोटूला उठवले.
- छोटूने तेव्हाच सापाला चिरडले आणि घराबाहेर फेकून दिले. त्यानंतर निश्चिंत होऊन छोटू झोपी गेला.
- रात्री सुमारे 3 वाजता अचानक छोटू घाबरल्यासारखा करु लागला. त्याला अस्वस्थ वाटायला लागले. त्याने पत्नी कमलाला उठवले.
- पतीची अवस्था पाहून कमलाने शेजाऱ्यांना बोलावले. मात्र छोटूला वाचवता आले नाही.
- अशी शक्यता व्यक्त होत आहे, की सापाला मारत असताना सापाने त्याला दंश केला असेल.
- असेही बोलले जात आहे की छोटू झोपल्यानंतर साप त्याला चावला.
मंगळवारी दुपारी घोडाडोंगरी येथील हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम झाले.
- चोपना पोलिस स्टेशनचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समध्ये वाचा, त्या रात्रीचा घटनाक्रम
बातम्या आणखी आहेत...