आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्जन्म? 20 वर्षांनंंतर नागिनने घेतला मुलीच्या रुपात जन्म; फुंत्कारतेही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/गुना- ती नागिनसारखी विव्हळते, फुंंत्कारतेही. काही वेळा तर तिला सावरणे कठीण होऊन जाते. या कारणामुळे तिचे संंसार मोडण्याच्या मार्गावर आहे. सासरच्या लोकांना तिला माहेरी सोडले आहे. ही कथा आहे 19 वर्षीय रचनाची.

रचना सांगते की, तिचा हा पुनर्जन्म झाला आहे. 20 वर्षांपूर्वी ती एक नागिन होती. तिला एका कारने कुचलेले होते. त्यात तिचा मृत्यू झाला होता. तिचा साथीदार नाग अजूनही जिवंत असून तो तिची वाट पोहातो आहे. रचनाचे वागणे व हावभाव पाहून तिचे आई-वडील त्रस्त झाले आहेत.

सगळे तिला संंबोधतात नागिन...
गुना जिल्ह्यातील मृगवासपासून सहा किलोमी‍टर अंतरावरील जोहरीपुरा येथे सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे रचना अहिरवार या तरुणीची. गावातील सर्व लोक तिला नागिन संंबोधतात. रचनाच्या अंगात संचारलेली कथित नागिन बाहेर काढण्यासाठी मंगळवारी तथाकथित होमहवन करण्‍यात आला. पण, त्याचाही काही उपयोग झाला नाही.

रचनाच्या वडील जमनालाल अहिरवार यांनी सांगितले की, मुलगी ठिक होण्यासाठी त्याने अनेक उपाय केले. अनेक नवसही मानले आहे. रचनाला तिच्या सासरच्या लोकांनी माहेरी सोडले आहे. तिचे आयुष्य उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे.

शिव मंदिरात मंगळवारी तांत्रिक होमहवन करण्यात आला. मांत्रिकाने तब्बल दीड तास मंत्रजाप केला. रचना जवळपास एक तास बेशुद्ध होती. यावेळी शिवमंदिरात पंचक्रोशीतील हजारों नागरिक उपस्थित होते. रचना इच्छाधारी नागिन अााहे, असे मांंत्रिक सांगतो.
जाळले नसते तर नाग घेऊन गेला असता...
रचनाने सांगितले की, ती एक नागिन आहे. तिचा नाग गावापासून जवळच असलेल्या टेकडीवर राहातो. तो आजही तिची वाट पाहातो आहे. 20 वर्षांपूर्वी तिला एका कारने कूचलले होते. नंतर लोकांंनी तिला जाळून टाकले होते. मेल्यानंतर जाळले नसते तर तिचा प्रियकर नाग घेऊन गेला असता, असा दावा रचनाने केला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, घटनेशी संंबंंधित फोटोज व व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...