आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 व्‍या वर्षी झाला IAS, सोडली नोकरी, आता सुरू केले मोफत कोचिंग क्‍लास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोमन सैनी (डावीकडे) आणि  गौरव मुंजाल - Divya Marathi
रोमन सैनी (डावीकडे) आणि गौरव मुंजाल
जयपूर (राजस्‍थान) - आपल्या मुलाने शिकावे, खूप प्रगती करावी आणि मोठे होऊन कलेक्टर बनावे, अशी प्रत्येक आई -वडिलांची इच्छा असते. मात्र, या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या या विचाराच्याही पुढे जाऊन काही तरी बनण्याचा विचार केला. वयाच्या १६ वर्षी एम्सची प्रवेश परीक्षा पास झाला. डॉक्टर झाल्यानंतर प्रॅक्टिस करता करता आयएएस बनण्याची इच्छा झाली. वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास करून देशातील सर्वात युवा आयएएस अधिकाऱ्यांमध्ये नाव मिळवले. असे असले तरी जयपूरला राहणाऱ्या रोमन सैनी यांच्यासाठी हे यश जास्त मोठे नव्हते. ते आता देशातील शिक्षण पद्धतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या मित्रासोबत "ऑनलाइन एज्युकेशन स्टार्टअप' सुरू करण्याचा निर्णय घेतला.
पंतप्रधान कार्यालयाने दिले भेटीचे निमंत्रण
- केवळ गरजू विद्यार्थ्‍यांना शिक्षण देता यावे, यासाठी आयएएस नोकरीचा राजीनामा देणारा तो देशातील पहिला अधिकारी आहे.
- रोमन हा जबलपूर (मध्य प्रदेश) मध्‍ये अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी होता. आता आपला पूर्ण वेळ एज्‍युकेशन स्टार्ट-अप ‘अॅकाडमी’ ला देणार आहे.
- त्‍याच्‍या या निर्णयामुळे पंतप्रधान कार्यालयाने त्‍याला 16 जानेवारीला भेटीचे निमंत्रण दिले आहे.
अकरावीमध्‍येच केले होते निश्चित...
- रोमन आणि त्‍याचा मित्र गौरव मुंजाल हे इयत्‍ता अकरावीमध्‍ये सोबत ट्यूशनला जात होते. मात्र, अनेक गरजू विद्यार्थी आर्थिक कारणाने ट्यूशन घेऊ शकत नाहीत. त्‍यामुळे प्रत्‍येकालाच ट्यूशन मिळावे, असे त्‍यांना वाटले.
- त्‍याच वेळी त्‍यांनी ऑनलाइन क्‍लास सुरू करण्‍याचे निश्चित केले होते.
- त्‍या दृष्‍टीने 2011 मध्‍ये यू-ट्यूब चॅनलच्‍या माध्‍यमातून त्‍याची सुरुवातही केली. त्‍याची पायाभरणी त्‍याचा मित्र गौरवने केली.
- त्‍यावर आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक व्‍हिडिओ अपलोड करण्‍यात आले आहेत.
- त्‍यामुळे पाच लाख विद्यार्थ्‍यांना फायदा झाल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले.
पुढे वाचा, डॉक्‍टर, आयएएस ते शिक्षक असा आहे प्रवास...