आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Allegedly Misbehave With A Married Woman, People Beat Up Him

VIDEO: अश्लिल हावभाव करणाऱ्या रोडरोमियोला तरुणीने चपलेने झोडपले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्य प्रदेश)- मंदसौर या शहरातील ही घटना आहे. अश्लिल हावभाव करणाऱ्या रोडरोमियोला तरुण विवाहीत महिलेने भररस्त्यात चांगलाच धडा शिकवला. तरुणीने प्रथम मोठ्याने आवाज करत लोकांना मदतीसाठी बोलवले. त्यानंतर लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. पण तरीही त्यांच्या तावडीतून तो सुटला. पळू लागला. तेव्हा तरुणीने त्याचा पाठलाग केला. पायातील चप्पल काढून त्याला चांगलेच मारले. गेल्या काही दिवसांपासून हा तरुण तिचा पाठलाग करीत होता. जेव्हाही ही तरुणी दिसायची तो अश्लिल भाषेत बोलण्याचा प्रयत्न करायचा. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.
रोज काढायचा छेड, पतीशीही घातला वाद
संबंधित तरुण महिला दररोज मुलाला सोडण्यासाठी त्याच्या शाळेत जायची. यावेळी हा रोडरोमियो तिचा पाठलाग करायचा. याची तक्रार या तरुणीने पतीकडे केली होती. त्यानंतर पती तिच्यासोबत मुलाला शाळेत सोडण्यासाठी आला. तेव्हाही त्याने अश्लिल कॉमेंट्स केल्या. पतीने जाब विचारला तेव्हा त्याच्याशी वाद घातला. यावेळी इतरही नागरिक जमा झाले. तरुणीने लोकांना रोडरोमियोची कृत्ये सांगितली. तेव्हा लोकांनी त्याला चांगलेच बदडले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेचे फोटो... तरुणीने अशी काढली पायातली चप्पल... त्याला असे सडकून मारले...