आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Youth Cheated Hotel Owner In Bhopal, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणाने चायनीज मॅजिक पेनच्या साह्याने हॉटेल चालकाला लावली तीन लाखांची शेंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - काश्मीरच्या एका तरुणाने चायनीज मॅजिक पेनच्या साह्याने येथील चार हॉटेल संचालकांना तीन लाख रुपयांनी शेंडी लावल्याचे उघड झाले आहे. आरोपीचे नाव हयात मोहंमद शौकत असे आहे. तो हॉटेल मालकांना वॉशिंग प्रॉडक्टचा सेल्समन म्हणून भेटला होता.
त्यांना अतिशय स्वस्त दरात सामान देण्याचे आमिष शौकतने दिले होते. त्यासाठी त्याने प्रत्येकी ११०० रुपयांचे चेक घेतले. विशेष म्हणजे त्याच पेनने त्याने व्यापा-यांना चेकवर रक्कम लिहायला सांगितली. त्यानंतर त्याने चेकवरील रक्कम खोडून टाकली. त्यावर मोठी रक्कम टाकली. शौकतला मुंबईतील आझादनगर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी शौकतला भोपाळच्या न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला २९ सप्टेंबरपर्यंत कोठडीत पाठवले आहे.

११ हजारांचे २ लाख ३० हजार
४४ वर्षीय शौकत मूळचा पुलवामा येथील आहे. १८ रोजी तो भोपाळच्या शालिमार हॉटेलमध्ये आला. हॉटेलचा पार्टनर विनोद दत्ताकडून सामानाची ऑर्डर आणि ११ हजार रुपयांचा चेकही घेतला. दत्ताने शौकतच्या पेननेच रक्कम भरली. नंतर दत्ताला चेकमधील रकमेत अफरातफर झाल्याचे लक्षात आले. खात्यावरून २ लाख ३० हजार रुपये पळवण्यात आल्याने दत्ता यांना धक्का बसला. चार दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी शौकतला अटक केली होती.

काळ्या पेनचा आग्रह
शौकत धनादेशावर लिहिताना व्यापा-यांना काळ्या शाईने लिहिण्याचा आग्रह करत असे. कंपनी काळ्या शाईने लिहिलेले चेक मंजूर करते, असे व्यापा-यांना सांगत.

टीव्हीतून सुचली कल्पना
टीव्हीवर चायनीज मॅजिक पेनसंबंधीचा एक कार्यक्रम पाहिला होता. त्यावरून चोरीची ही कल्पना सुचल्याचे शाैकतने सांगितले.

हेअर ड्रायरचा वापर
चेकवर हवी ती रक्कम लिहिल्यानंतर शौकत चेकच्या मागील बाजूस हेअर ड्रायर किंवा काडीपेटीतील काडीने त्याला गरम करत. त्यामुळे ही चायनीज मॅजिक पेनची शाई उडून जात. त्यानंतर तो मनाला येईल ती रक्कम लिहीत असे.