खंडवा/इंदूर- प्रेमात सगळ्या गोष्टी नगण्य असतात असे म्हटले जाते. सुश्मिता अपंग आहे. पाय नसल्यामुळे तिला नीट चालता येत नाही. दैनंदिन कामांसाठीही तिला इतरांवर अवलंबून राहावे लागते. पण तरीही दिनेश नावाच्या देखण्या तरुणाचे तिच्यावर प्रेम जडले. एवढेच नव्हे तर त्याने तिच्याशी लग्नही केले. आता दोघांचा सुखी संसार सुरु आहे.
दिनेश मेघवाल केअर टेकरचे काम करतो. 2013 मध्ये त्याची भेट सुश्मिता बागरीसोबत एका रुग्णालयात झाली. ती बालपणापासून एका आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे तिला नीट चालता येत नाही. त्यावर उपचार करण्यासाठी ती एक रुग्णालयात गेली होती. तेथे तिची भेट दिनेशशी झाली तो तिचा केअर टेकर होता. त्यानंतर दोघे प्रेमात पडले.
डॉक्टरांच्या चुकीने सुश्मिता अपंग
बालपणी सुश्मिताच्या पाठीवर एक जखम झाली होती. कालांतराने त्यात इन्फेक्शन झाले. ते पायांमध्ये पसरले. डॉक्टरांनी एका पायाचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ऑपरेशन करण्यात आले. पण एक चुक झाली. डॉक्टरांनी चुकीच्या पायाचे ऑपरेशन केले. त्यामुळे सुश्मिता दोन्ही पायांनी अपंग झाली. तिला आता चालताही येत नाही.
सुश्मिताच्या आईवडीलांचा लग्नाला विरोध
सुश्मिताच्या आईवडीलांनी दिनेश आणि तिच्या लग्नाला विरोध केला. दिनेशने अशा प्रकारे त्यागाच्या भावनेतून लग्न करु नये असे त्यांना वाटत होते. पण अखेर दोघेही आपल्या निर्णयावर ठाम होते. 2014 मध्ये त्यांनी लग्न केले. तरीही सुश्मिताचे नातलग तिच्या विरोधात होते. त्यांनी सुश्मिताला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघे घरातून बाहेर पडले. दिनेशने नोकरी केली. खंडव्यात घर घेतले. आता दोघे या नवीन घरी राहतात. सुश्मिताला कृत्रिम पायही लावण्यात आले आहेत. आता ती काही काळासाठी उभी राहू शकते.
पुढील स्लाईडवर बघा, या दोघांच्या सुखी संसाराची काही छायाचित्रे....