आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगानंतर आणखी एक विक्रम! एकाच वेळी परीक्षा देणार १.१ कोटी परीक्षार्थी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीकर - भारताने २१ जूनला अवघ्या जगाकडून योगासने करून घेत विश्वविक्रम नोंदवला. आता भारत आणखी एका विक्रमाच्या तयारीत आहे. एका परीक्षेत सर्वाधिक परीक्षार्थींच्या सहभागाचा विक्रम भारत नोंदवेल.

सध्या हा विक्रम चीनच्या नावे आहे. तेथे दरवर्षी होणाऱ्या नॅशनल हायर एज्युकेशन एन्ट्रन्स परीक्षेत सुमारे ९५ लाख परीक्षार्थी भाग घेतात. आता साक्षर भारत अभियान मिशन परीक्षेच्या माध्यमातून हा विक्रम मोडीत काढण्याची तयारी सुरू आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या परीक्षेत १६ वर्षे ते ६० वर्षांपर्यंतच्या १.१० कोटी नवसाक्षरांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

संपूर्ण देशात एकाच वेळी २३ ऑगस्टला सकाळी १० ते ५ वाजेच्या मुदतीत ही परीक्षा घेतली जाईल. निर्धारित वेळेत नवसाक्षरांना ही परीक्षा देता येईल. साक्षर भारत अभियानात सध्या १.४० कोटी लोक शिकत आहेत. अभियानाचे राजस्थानातील सहसंचालक शीशराम चावला म्हणाले की, या अभियानाअंतर्गत २०१७ पर्यंत संपूर्ण भारताला साक्षर बनवण्याचे ध्येय आहे.

४१० जिल्ह्यांत २ लाख केंद्रे, १५० गुणांचा पेपर
१५० गुणांची प्रश्नपत्रिका आणि तीन तासांचा वेळ असेल. तेरा भाषांत घेतल्या जाणारी ही परीक्षा २६ राज्यांतील ४१० जिल्ह्यांतील दोन लाख केंद्रांवर होईल. यात लिहिणे, अक्षर व शब्द ओळखणे आणि गणिताचे प्रश्न असतील. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या श्रेणी दिली जाते. क श्रेणीतील परीक्षार्थींना नापास समजून त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाते. विशेष म्हणजे परीक्षार्थींत ७० टक्के महिला असतील.
अशी आहे चीनची सर्वात मोठी परीक्षा
नॅशनल हायर एज्युकेशन एन्ट्रन्स एक्झामिनेशन दरवर्षी होते. परीक्षेसाठी वयाची सक्ती नाही. त्याच्या माध्यमातून उच्चशिक्षण संस्थांत अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये प्रवेश मिळते. त्यात २००६ मध्ये ९५ लाख लोकांनी सहभागी होत नवा विश्वविक्रम नोंदवला होता.
बातम्या आणखी आहेत...