आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृदयात एक कोटीचे उपकरण; ‘हार्टमेट टू’ डिव्हाइस, शस्त्रक्रियेची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- गुगल प्लस शस्त्रक्रियेनंतर जयपूरमध्ये आणखी एका शस्त्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे. येथील डॉक्टर्स हृदयरुग्णांना ‘हार्टमेट टू’ उपकरण बसवण्याच्या तयारीत आहेत. हे कृत्रिम हृदय नाही किंवा हार्ट रिप्लेसमेंटही नाही. हा हार्ट पंप आहे. रुग्णाची धडधड बंद पडल्यास हे उपकरण कृत्रिम हृदयाप्रमाणे ठोके सुरू ठेवत शरीरात रक्त पुरवठा करण्याचे काम करेल. जयपूरमध्ये ही अशा पद्धतीची पहिलीच शस्त्रक्रिया असेल. याआधी नोव्हेंबर 2013 मध्ये चेन्नईत पहिल्यांदा रुग्णाला हे उपकरण बसवण्यात आले होते. रुग्णाच्या कमकुवत हृदयाला हार्टमेट टू जोडले जाईल. उपकरण बॅटरीच्या साहाय्याने चालेल. डॉक्टर सध्या रुग्णांवर चाचणी घेत आहेत. पहिल्या प्रत्यारोपणासाठी अमेरिकी डॉक्टरांचे पथक जयपूरला येणार आहे.
10 लिटर प्रतिमिनिट रक्त पुरवठा करेल हार्ट पंप, सामान्य हृदय प्रतिमिनिट पाच लिटर रक्त पुरवठा करते.
1. हार्ट पंप, प्रत्यारोपणाचा पर्याय असेल
2. औषधांचा खर्च 30 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकेल
3. सात वर्षांपर्यंत हृदयाचे वय वाढेल
जयपूरमध्ये ‘हार्टमेट टू’ डिव्हाइस, शस्त्रक्रियेची तयारी
05 लाख रुपये हॉस्पिटल खच
95 लाखांचे उपकरण
सध्याची स्थिती
जयपूरच्या रुग्णांना हृदय प्रत्यारोपणासाठी दिल्ली किंवा चेन्नईला जावे लागते
18-20 लाख, 70,000-80,000 रुपयांपर्यंत प्रतिमाह औषधांचा खर्च