आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस वर्दीत गुंडांचा जेलवर हल्ला; दाेन अतिरेक्यांसह सहा कैदी पळवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाभा(पतियाळा) - रविवारी सकाळी ८.३० वा. बाराजणांनी पंजाबमधील नाभाच्या तुरुंगावर हल्ला केला. त्यांनी २ खलिस्तानी अतिरेकी आणि ४ गँगस्टर्सना सोडवले. केवळ १३ मिनिटांत ही सुटका केली. ६ हल्लेखोर पोलिसांच्या वर्दीमध्ये होते. त्यांनी १०० फैरी झाडल्या. मात्र, तुरुंग रक्षकांनी एकही गोळी झाडली नाही. यामुळे या हल्ल्यात तुरुंग प्रशासन सहभागी तर नसेल ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळी फॉर्च्युनर कारसह दोन गाड्या तुरुंगासमोर उभ्या होत्या. तीन अन्य गाड्या गेटपासून जवळच होत्या. ८.३० वाजता एक कार मेन गेटवर आली. सर्व पोलिसांच्या वेशात असल्याने रक्षकाने गेट उघडले. आत पोहोचताच हल्लेखोरांनी बराकींच्या गेटवरील रक्षकाकडून चावी मागितली. नकार देताच धारदार शस्त्रांनी त्याला जखमी केले. चावी हिसकावून गोळीबार सुरू केला. आरडाओरड ऐकताच सहा कैदी गेटवर आले. गोळीबारामुळे घाबरलेले सुरक्षा रक्षक लपले. कोणीच प्रत्युत्तरादाखल कारवाई केली नाही. अारोपींनी फॉर्च्युनरमध्ये बसलेल्या चालकाला डिकी उघडण्यास सांगितले. त्यात शस्त्रसाठा होता. एका हल्लेखोराने रजईत लपेटलेली शस्त्रे कैद्यांनाही दिली. यानंतर सर्वांनी गोळीबार करत पळ काढला. दीड किमी अंतरावर रेल्वे फाटक बंद दिसल्यावर परत फिरून तुरुंगासमोरूनच पळाले.

बेजबाबदार : तीन मोठ्या संधी पोलिसांनी गमावल्या
- हल्लेखोरांनी १०० फैरी झाडल्या. पण एकालाही गाेळी लागली नाही. अर्ध्या तासापर्यंत त्यांना कुणी अडविलेही नाही.
- देखरेखीच्या टॉवरवर जवान तैनात होता. तो गोळीबार न करता लपून बसला.
- कैद्यांना सोडवल्यानंतर हल्लेखोर काही वेळ गेटवर थांबले. तेव्हाही कुणीच त्यांना पकडण्याचा प्रयत्न नाही केला.
- दीड किमीवरील रेल्वे फाटक बंद दिसताच हल्लेखोर यू टर्न घेऊन पुन्हा तुरुंगासमोरूनच गेले. तेव्हाही कुणी अडवले नाही.
- गोळीबाराची संधी साधून अन्य कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न का नाही केला?

पुढे वाचा,
- पळून गेलेल्या अतिरेक्यांविषयीची माहिती...
- नाकाबंदीत कार थांबली नाही; पाेलिसांच्या गाेळीबारात नर्तकी ठार
बातम्या आणखी आहेत...