आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुरी एक्स्प्रेस अपघातग्रस्त दहा डबे घसरले, तीन ठार; २५० प्रवासी जखमी, नऊजण गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कौशांबी - अलाहाबाद कानपूर रेल्वे मार्गावर कौशांबी येथे सोमवारी मुरी एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले. या अपघातात एका महिलेसह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अन्य २५० जण जखमी झाले. पैकी नऊ जणांना गंभीर जखमा झाल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सोमवारी मुरी एक्स्प्रेस राऊकेलाहून जम्मूकडे जात होती. सिराथू व अटसराय स्टेशनदरम्यान गाडीचे एसी कोच व दोन स्लीपार कोचसह पाच डबे दहा डबे रूळावरून घसरले. त्यात एस - ३ हा डबा पूर्णपणे उलटला. त्यात झारखंडहून हटियाला जाणारी सीता (४०) ही महिला व इतर दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर २५० जण जखमी झाले. अपघातानंतर अलाहाबाद व फतेपूर येथून २० अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आल्या व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अडकलेल्या प्रवाशांना दुसऱ्या विशेष गाडीने अलाहाबादला नेण्यात आले. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.

१७० रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले
अपघातानंतर दिल्ली - हावडा मार्गावरील तीन गाड्यांचे मार्ग बदलावे लागले. तर इतर अनेक ट्रेन आजूबाजूच्या स्टेशनवर थांबवून ठेवण्यात आल्या. अपघातामुळे जवळपास १७० गाड्या विलंबाने धावत आहेत. अलाहाबाब - कानपूर इंटरसिटी, आनंदविहार- टर्मिनल या गाड्या रद्द झाल्या.
बातम्या आणखी आहेत...