आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UP : मुरी एक्स्प्रेसचे 10 डबे घसरले; चार ठार. 250 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोशिंबी (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशातील अलाहाबादपासून 40 किलोमीटर दूर कोशंबी जिल्ह्यातील सिराथूच्या अठसराये रेल्वे स्टेशनजवळील राउरकेला येथून जम्मूतवीला जात असलेल्या मूरी एक्स्प्रेसचे 10 डबे घसरले आहे. एसीचे दोन कोच, स्लीपरचे पाच आणि एक जनरल डबा रुळावरुन घसरला. रुळावरुन घसरलेले डबे एकमेकांवर आदळले. या अपघातात चार जण दगावले असून 250 प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी विजयकुमार यांनी मृतांची आणि जखमींची अद्याप अधिकृत माहिती नसल्याचे सांगितले आहे.
रेल्वे राज्यमंत्री घटनास्थळी रवाना
रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी जखमींना तातडीने उपचार मिळाले पाहिजे अशा सुचना संबंधितांना दिल्या आहेत. सिन्हा गाजीपूरमध्ये होते, ते देखील घटनास्थळी रवाना झाले.
हेल्पलाइन नंबर
05121072
वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी विजयकुमार यांनी सांगितले, की मुगलसराय आणि अलाहाबाद येथून मदत पथक रवाना करण्यात आले आहे. उत्तर प्रेदश सरकारच्या मुख्य सचिवांनीही मदत कार्य सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये मदत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे.