आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील TOP 10 ऐतिहासिक पर्यटन स्थळे; हवामहालपासून ते म्हैसूर पॅलेसपर्यंतचा प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील पर्यटकांना भारताविषयीची विलक्षण ओढ आहे. येथील संस्कृती येथील रितीरिवाज हे जगातील सर्वश्रेष्ठ मानले जातात. पर्यटक येथे शांततेच्या शोधात येतात. भारताला निसर्गाचे जे देण लाभले आहे ते पृथ्वीवरील इतर दुसर्‍या कोणत्याच देशाला लाभलेले नाही. येथे अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत. बदलणार्‍या ऋतुसोबत प्रत्येक पर्यटन स्थळाचे महत्त्व वाढत जाते त्यामुळे प्रत्येक पर्यटन स्थळाला त्या त्या ऋतुमध्येच भेट देण्यासाठीही जगभरातील पर्यटक इच्छूक असतात. अनेक परदेशी पर्यटक येथे येऊन येथेच वसलेलेसुध्दा आढळून येते. तसेच भारतात विविध सण उत्सव साजरा केले जातात. त्यामुळेही अनेक ठिकाणचे त्या त्या उत्सवादरम्यान विशेष महत्त्व वाढते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भारतातील ऐतिहासिक स्थळाबद्दल सांगणार आहोत. येथे कुटुंबासमवेत अथवा जोडीदारासोबत जाण्यास हरकत नाही.

हवा महाल
गुलाबी शहर म्हणून ओळख असलेल्या जयपूरमधील हवामहाल हे राजस्थानचे प्रतिक असून जगभरात राजस्थानची ओळख याच वास्तूमुळे होते. या महालामध्ये 365 खिडक्या आणि तावदाने आहेत. याची निर्मिती 1799 मध्ये जयपूरचे महाराजा सवाई प्रताप सिंह यांनी केली होती. राजस्थानी आणि पारसी स्थापत्य शैलीच्या मिळत्या जुळत्या रुपात बनवण्यात आलेली ही इमारत जयपूरच्या बडीचौपड चौकातून चांदी टकसाल जाणार्‍या रस्त्यावर आहे. हवामहलाचे 'आनंदपोल' आणि 'चांदपोल' नावाचे दोन प्रवेशव्दार आहेत. आनंदपोलवर बनवण्यात आलेली गणपतीच्या मुर्तीमुळे या द्वाराला 'गणेशपोल' सुध्दा म्हटले जाते. गुलाबी शहराचे हे गुलाबी गौरव आपल्या आकर्षक आणि आश्चर्यकारक बांधकामामुळे आज जगभरात प्रसिध्द आहे.


कसे जायचे -
ही वास्तू जयपूरमध्येच असल्याने येथे हवाई, रेल्वे आणि रोड अशा तिन्ही मार्गाने जाता येते.

केव्हा जावे -
राजस्थानमध्ये खुप मोठ्या प्रमाणात उन असते, त्यामुळे थंडीच्या दिवसातच येथे जाणे उत्तम.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, भारतातील इतर ऐतिहासिक स्थळांबद्दल