आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी लंकेश मर्डर: मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस; कर्नाटक सरकारची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- कर्नाटक सरकारने पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याबाबत पोलिसांना माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस देण्याचे शुक्रवारी जाहीर केले आहे. कर्नाटकचे गृहमंत्री रामालिंग रेड्डी यांनी बक्षिसाची घोषणा करण्यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत सरकारी निवासस्थानी चर्चा केली होती. 

रेड्डी म्हणाले, विशेष तपास पथकाच्या साहाय्याने या प्रकरणाचा तपास वेगाने करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार टीमने तपासाला सुरुवात केली आहे. एसआयटीला गरज भासल्यास पोलिस अधिकाऱ्यांची टीम तपासासाठी दिली जाईल. गौरी लंकेश यांच्या हत्येचा प्रत्येक बाजूने काटेकोर तपास करण्यास सांगण्यात आले आहे. तपासांती सत्य बाहेर येणार आहे. एसआयटी आपला अहवाल दोन आठवड्यांत सादर करेल. मुदत संपल्यावर मात्र या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला जाणार आहे. 

राज्याचे खाद्यमंत्री विनय कुलकर्णी यांनी स्वत:साठी झेड सुरक्षेची मागणी केली आहे, अशी माहिती रेड्डी यांनी दिली. गृह खात्याने तशी तयारी दर्शवली आहे. जीविताला धोका असणाऱ्या प्रत्येकास सुरक्षा देण्याची सरकारची तयारी आहे, असे रेड्डी यांनी सांगितले. दरम्यान, हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारीही ठिकठिकाणी निदर्शने झाली. 
बातम्या आणखी आहेत...