आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एनजीओच्या ताब्यातील १० मुलींची झाली सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यात नवजातांच्या तस्करीच्या प्रकरणात सीआयडीने शुक्रवारी एका मानसिक आरोग्य केंद्रातून १० नवजात मुलींची सुटका केली. त्यांचे वय एक ते दहा महिने असल्याचे सांगितले जात आहे.

सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठाकूरपूर ठाण्याच्या कोलागछियात पुरबाशा मानसिक आरोग्य केंद्रातील छाप्याच्या वेळी तिसऱ्या मजल्यावरून या मुलींची सुटका करण्यात आली.या कारवाईनंतर काही तासांनीच हर्बरा मचलंदरपूर येथील सुजित मेमोरिअल ट्रस्टमधून नवजातांच्या कवट्या आणि हाडेही जप्त करण्यात आली. या टोळीत अनेक नर्सिंग होम, क्लिनिक आणि एनजीओ सामील आहेत. मानसिक आरोग्य केंद्राची मालकीण रीना बॅनर्जी आणि तिची आई पुतुल यांना अटक करण्यात आली. त्यामुळे अटक झालेल्यांची संख्या १५ झाली असून त्यात सात महिला आहेत.
बातम्या आणखी आहेत...