आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेलंगणामध्ये नागार्जुनसागर कालव्यात कोसळली बस; 10 जणांचा मृत्यू, 18 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैद्रराबाद- एक खासगी बस पुलावरुन कालव्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात 10 प्रवाशांंचा मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) पहाटे तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील नागार्जुनसागर कालव्यावर हा अपघात झाला. अपघातात 18 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैैकी काही प्रवाशांंची प्रकृती चिंंताजनक आहे. अपघातग्रस्त बस हैदराबादहून काकीनाडा येथे ही बस जात होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आतापर्यंत 10 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
बस नागार्जूनसागर कालव्याजवळ पोहोचल्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व बस थेट कालव्यात कोसळल्याचा प्राथमिक अंंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, दुर्घटनेची भीषणता दर्शवणारे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...