आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोफेसरचे हात कापल्या प्रकरणी १० जणांना दोषी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोची - पाच वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात प्रोफेसरचे हात कापल्याबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने शुक्रवारी १० जणांना दोषी ठरवले. दोषींना प्रत्येकी ८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इतर तीन दोषींना दोन वर्षे तुरुंगात राहावे लागणार आहे. दंड म्हणून आठ लाख रुपये भरावे लागतील. हा पैसा पीडित प्रोफेसरला दिला जाणार आहे.

ही घटना २०१० ची आहे. इडुक्की जिल्ह्यातील तोडुपुझाच्या न्यूमॅन कॉलेजचे प्रोफेसर टी. जे. जोसेफ यांच्यावर कट्टरवादी गट पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. प्रोफेसर जोसेफ रविवारच्या प्रार्थनेत होते. प्रार्थना झाल्यानंतर ते चर्च बाहेर येताच त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा उजवा हात कापण्यात आला होता. जोसेफ यांनी बीकॉमच्या सेमिस्टर परीक्षेसाठी तयार केलेल्या प्रश्नपत्रिकेत एक कथित धर्मविरोधी भाष्य करण्यात आले होते. त्यावर आक्षेप घेऊन हा हल्ला करण्यात आला. कोर्टाने १ मे रोजी १० दोषींवर बेकायदा व्यवहार प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि उर्वरित तीन जणांना विविध कलमांखाली दोषी ठरवले. न्यायमूर्ती पी. शशिधरन यांनी इतर १८ जणांची पुराव्याअभावी सुटका केली होती. या प्रकरणात मुख्य आरोपींसह ६ जण फरार आहेत.