आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Sarpanches Killed In Kashmir In Last Four Years

काश्मिरात चार वर्षांत दहा सरपंचांची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - काश्मीर खोऱ्यात गेल्या चार वर्षांत अतिरेक्यांच्या हल्ल्यात १० सरपंचांची हत्या व तिघे जखमी झाल्याची माहिती सरकारने बुधवारी दिली. दहशतवाद्यांच्या धमकीमुळे २० सरपंचांनी राजीनामा दिला.
विधानसभेतील लेखी उत्तरात ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री अब्दुल हक खान यांनी सरकार ग्रामपंचायत सदस्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखत असल्याचे सांगितले. बारामुल्ला जिल्ह्यात सहा सरपंचांची हत्या व तिघांना जखमी करण्यात आले. शोपियानमध्ये एकाची हत्या व एक सरपंच जखमी झाला.
याशिवाय एक सरपंचाची हत्या व दोन जखमी झाले. १२ जिल्ह्यांत २० सरपंचांची हत्या करण्यात आली, तर धमक्यांमुळे १२८ पंचांनी राजीनामे दिल्याचे खान यांनी स्पष्ट केले. दहशतवादाच्या पाठाेपाठ गुन्हेगारीही वाढली असल्याने राज्यातील जनता धास्तावली आहे.