आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 हजार मंदिरे दिव्यांनी उजळली, घडले श्रीरामाच्या सेनेचे दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अयोध्या- अयोध्येत यंदा मोठ्या संख्येने लोक दक्षिण भारतातून आले आहेत. कनक भवनहून अलसुबह हेरिटेज वॉक सुरू झाले आणि नारेश्वरनाथ मंदिरात याचे विसर्जन झाले. कनक भवन राम जन्मभूमीजवळ आणि नागेश्वरनाथ मंदिर शरयूच्या किनाऱ्यावर.  दिवसा शोभायात्रा निघाली तेव्हा अयोध्यावासी याला अचंबित होऊन न्याहळत होते. अयोध्येतील शिक्षक विंध्य मणी त्रिपाठी यांनी सांगितले की, येथे लुप्त होणाऱ्या लोककलांनादेखील पाहता येते. उत्तर प्रदेशातील जुन्या जातीय लोकनृत्यांचे दर्शन घडते. फरवाही, धोबिया नृत्य प्रकार येथे दिसून येतात. मनोजकुमार पासी यांनी आश्चर्याने सांगितले की, गेल्या ५५ वर्षांत आपण येथे प्रथमच इंडोनेशिया, थायलंड आणि श्रीलंकेच्या कलाकारांना रामायण सादर करताना पाहिले. या देशांमध्येदेखील इतक्या सुरेख पद्धतीने रामलीला सादर होते हे पाहून आश्चर्य वाटले. दुपारी जेव्हा शोभायात्रा निघाली तेव्हा रामाच्या संपूर्ण सैन्याचे दृश्य समोर उभे राहिले.  १० विविध रथांवर सर्व स्वार होते. 

अयोध्येचे वेगळे रूप पाहायचे असेल तर सात प्रमुख आखाड्यांना पाहा. निर्वाणी आखाडा, खाकी आखाडा, दिगंबर आणि निर्मोही आखाडा तसेच संतोषी आखाडा येथे साधूंच्या अयोध्येतील अाध्यात्मिक उपदेशांची अनुभूती घेता येते. निरलंबी आणि महानिर्वाणी आखाड्यांमध्ये दिवाळी भक्ती आणि भावनांच्या दिव्यांनी देदीप्यमान होते. दुसरीकडे एक वेगळेच दृश्य पाहण्यास मिळते. ते म्हणजे येथील छावण्या. या छावण्या सैनिकांच्या नाहीत. साधूंचे असामान्य आश्रम येथे आहेत. या छावण्या नरसिंहदास, रघुनाथदास, बाबा रामप्रसाद, तपस्वीजी आणि मणि रामदास यांच्या आहेत. दिवाळीला सर्वात सार्थक करण्याच्या मनीषेने हे लोक अयोध्येत आलेल्या गृहस्थ वा संन्याशास उपाशी राहू देत नाहीत. महंत नृत्य गोपाळदास सांगतात की, अयोध्या तर रामराज्याचे प्रतीक आहे. येथून कोणीही उपाशी जाऊ शकत नाही.  
 
आम्ही राम-भरत मिलन मंदिरात गेलो. राम अयोध्येत पोहोचण्यापूर्वी ज्या ठिकाणी गेले होते त्या स्थळालाही आम्ही भेट दिली. या स्थळाचे नाव नंदिग्राम असून येथे एक तरुण साधू होते. त्यांनी सांगितले की, अयोध्या आजच्या विकासाचे ब्ल्यू प्रिंट आहे. त्यांना नाव विचारल्यावर त्यांनी आपण अनाम साधू असल्याचे सांगितले. त्यांच्या हातात एक चित्र होते. त्यावर स्मार्ट शहराचा आराखडा होता. त्यांनी सांगितले की, जगातील सर्वात पहिली स्मार्ट सिटी अयोध्या होती. वाल्मीकींनी बालकांडच्या पाचव्या प्रकरणात याच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे. हे कौशल जनपदातील शहर होते. शरयूच्या काठी वसले होते. हे तत्कालीन शिक्षण, संस्कार, कृषी आणि व्यापाराचे सर्वात प्रमुख केंद्र होते. या जनपदातच अयोध्यानगरी होती. शहराचे संस्थापक मनू होते. त्यांनी बालकांड दाखवल्यावर सर्वजण चकित झाले.  १० हजाहजार मंदिरांत दिव्यांची सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण देशाच्या दिवाळीने जणू अयोध्येचे रुप धारण केले आहे.
बातम्या आणखी आहेत...