आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमध्ये 10 वर्षीय अनाथ मुलीवर बलात्कार, पुरात वर्षभरापूर्वी गमावले आई वडील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तराखंडमध्ये गेल्या वर्षी जून महिन्यात आलेल्या पुरात आई वडील गमावल्याने अनाथ झालेल्या एका 10 वर्षीय बालिकेवर बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
टिहरी येथे 10 वर्षीय पीडित बालिकेला बाल निकेतनमधून देहरादूनला पाठवले जात असताना ही बाब उघड झाली आहे. या बालिकेला पाठवण्याआधी तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यातच तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले. या मुलीकडे चौकशी करण्यात आली त्यावेळी, दोन तीन दिवसांपूर्वी मनिराम नावाच्या एखा भंगारवाल्याने आपल्यावर अत्याचार केल्याचे या बालिकनेने सांगितले. उत्तराखंडमध्ये आलेल्या आपत्तीनंतर सुमारे 13 महीन्यांनी पोलिसांना या मुलीबाबात माहिती मिळाली. मंगळवारी काही लोकांनी तिला पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
एक वर्षभर झाली फरफट
पीडित बालिकेने सांगितलेल्या आपबीतीनुसार तिचे वडील मजुरीचे आणि शेतीचे काम करायचे. त्यांच्या घरावर नैसर्गिक संकट कोसळले तेव्हा ती जंगलात गेली होती. घरी परतली तेव्हा घर पूर्णपणे कोसळल्याचे तीने पाहिले. तिचे आई, वडील, आजी, आजोबा, भाऊ, बहीण कोणीही जीवंत नव्हते. गावात एका मंदिराजवळ घर होते, असे ती सांगते. तसेच तीने आपल्या कुटुंबाविषयीही माहिती दिली होती. तिला हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. ती सुमारे वर्षभर मेरठ आणि हरिद्वारमध्ये भटकत होती, असे तीने सांगितले.