आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1500 जणांना 100 कोटींचा चुना लावणाऱ्या हायप्रोफाईल गँगचा भांडाफोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी अटक केलेली टोळी. - Divya Marathi
पोलिसांनी अटक केलेली टोळी.
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) - 1500 लोकांना सुमारे 100 कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या दिल्लीच्या हाय प्रोफाइल गँगचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या टोळीतील 20 जणांना पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. त्यात 7 महिलांचाही समावेश आहे. विम्यापासून ते बोनस, कर्ज आणि घरांवर मोबाईल टॉवर लावण्याच्या बहाण्याने ते लोकांकडून पैसे उकळत होते. या टोळीच्या म्होरक्याने इंग्लंडमधून एमबीए केलेले असून तो तिथेच राहतो. तो इंग्लंडमध्ये नोकरीलाही होता.

अशी करायचे फसवणूक...
आरोपींनी इनफिनिटी इनव्हेस्टमेंट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड, इनफिनिटी लाइफ ट्रिप प्रायव्हेट लिमिटेड आणि फॅमिली ट्रिप-टूर पॅकेजेस लिमिटेड अशा कंपन्या तयार केल्या. ज्या लोकांच्या एलआयसीच्या पॉलिसी हप्ते न भरल्याने बंद झाल्या असेल अशांना टोळीतील सदस्य फोन करायचे. ज्या पॉलिसी बंद झाल्या आहेत त्या सरकारकडून पुन्हा सुरू करण्यात येणार असून बोनसही दिला जाणार असल्याचे ते लोकांना सांगायचे. त्या आमिषाने लोक त्यांच्या जाळ्यात अडकायचे त्यानंतर अशा लोकांकडून लाखो रुपयांचे चेक मागवायचे.

तक्रारीनंतर प्रकरण उघड
क्राइम ब्रँचच्या प्रभारी अतिरिक्त एसपी प्रतिभा मॅथ्यू यांच्याकडे एप्रिल महिन्यात ग्वाल्हेरच्या एका रेल्वे कर्मचाऱ्याने तक्रार केली होती. दिल्लीच्या फॅमिली ट्रिप-टूर पॅकेजेस लिमिटेडने त्या कर्मचाऱ्याशी संपर्क केला होता. कंपनीने एलआयसीचा बोनस देण्याच्या नावावर 17 लाख रुपये उकळल्याचे त्याने तक्रारीत सांगितले होते. त्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.

पत्नीचाही समावेश...
या कंपनीचा मालक आकाश बिर्ला आहे. या गोरखधंद्यात त्याची पत्नी उर्वशी मेहरा आणि मैत्रिण रिचा भटनागर यांचाही समावेश होता. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड हा सुमित रंजन आहे. सुमितने इंग्लंडच्या विद्यापीठातून एमबीए केले असून तो त्याठिकाणीच राहतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटो...