आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफा व्यापाऱ्याच्या घरावर प्राप्तीकर विभागाचा छापा; 90 कोटी रोकडसह 100 किलो सोने जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - प्राप्तिकर विभागाने चेन्नईत सराफा व्यावसायिकांवर छापे टाकून ९० कोटी रुपये रोख आणि १०० किलो सोन्याच्या सळ्या जप्त केल्या. जप्त केलेल्या रकमेपैकी ७० कोटी रुपये नव्या, तर २० कोटी रुपये जुन्या नोटांत असल्याचे सांगण्यात आले. जप्त रकमेचा खरा आकडा काय आहे हे जाणून घेण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी, ऑडिटर, नोटा मोजण्याची यंत्रे आणि बँक कर्मचाऱ्यांना बोलवावे लागले.

शहरात आठ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. जुन्या नोटा बदलणारी टोळी येथे सक्रिय असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. या टोळीशी संबंधित तीन जणांची चौकशी सुरू आहे. आर्थिक देवघेव, सोन्याची खरेदी-विक्री याच्याशी संबंधित कागदपत्रांचीही तपासणी सुरू आहे. नोटाबंदीनंतर मनी लाँडरिंग आणि हवाला व्यावसायिकांवर ईडी आणि प्राप्तिकर विभाग सातत्याने छापे टाकत आहे. चेन्नईआधी सर्वात जास्त ५.६७ कोटी रुपये बंगळुरूमध्ये पकडण्यात आले होते. दरम्यान, कोलकाता येथे १५ बँकांच्या शाखांवर छापे टाकल्यानंतर ईडीने दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांना सीबीआयकडे सोपवण्यात आले.

मोठ्या मनी एक्स्चेंज रॅकेटचा पर्दाफाश...
- न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍याने एकाच वेळी 8 ठिकाणी छापे टाकून मोठ्या मनी एक्स्चेंजर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
- प्राप्तीकर अधिकारी शेखर रेड्डी, श्रीनिवास रेड्डी यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
- अण्णा नगर आणि टी नगरात अधिकार्‍यांनी 8 ठिकाणी एकाच वेळी ही छापेमारी केली आहे.
- सराफ्याच्या घरातून 100 किलो सोने आणि 90 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यात 70 कोटी रुपयांच्या नव्या नोटा आहेत.
बातम्या आणखी आहेत...