आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभेच्‍या हिवाळी अधिवेशनातच 100 आमदारांनी घेतली सुटी; कारण एकच- \'लग्‍न\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- आंध्रप्रदेशमध्‍ये सध्‍या विधानसभेचे अधिवेशन सुरु आहे. मात्र याचदरम्‍यान सत्‍ताधारी तेलगू देसम पक्षाच्‍या 100 आमदारांनी सुटीसाठी अर्ज केला आणि तो विधानसभा अध्‍यक्षांनी मंजूरदेखील केला. यामुळे येथील विधानसभा भवन जवळपास रिकामे झाले आहे. महत्‍त्‍वाचे म्‍हणजे या सर्व आमदारांनी सुटीसाठी एकच कारण सांगितले आहे. ते म्‍हणजे, 'आम्‍हाला लग्‍नात सहभागी व्‍हायचे आहे.'   


अधिवेशनाचा काळ आणि लग्‍नाची घाई
या महिन्‍याच्‍या सुरुवातीला आंधप्रदेश विधानसभेचे सत्र सुरु झाले होते. ते 30 तारखेला संपणार आहे. मात्र हाच काळ येथे लग्‍नासाठी फार शुभ मानला जातो. याचकारणामुळे आंध्रपदेशात याकाळात जवळपास 1,20,000 विवाह होणार आहेत. आता लोकप्रतिनिधी म्‍हटले की, जनसंपर्कासाठी विवाहात सहभागी होण्‍याला अतिशय महत्‍त्‍व. त्‍यामुळे सर्व आमदारांनी सुटीसाठी हेच अचूक कारण सांगितले. यासाठी सत्‍ताधारी तेलगू देसमच्‍या 100 आमदारांनी विधानसभा अध्‍यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांना विकेंडनंतर 2 दिवसांची सुटी देण्‍यात यावी, अशी विनंती केली होती. ती शिवप्रसाद राव यांनी मान्‍य केली आहे. मात्र त्‍याचबरोबर अधिवेशन आणखी 2 दिवस चालु ठेवण्‍यासही या आमदारांनी आपली सहमती दर्शवली आहे.


अधिवेशनला उपस्थित सर्वच आमदारांनी मागितली सुट्टी
यातील महत्‍त्‍वाची बाब म्‍हणजे आंध्र प्रदेशमध्‍ये ऐकूण 176 आमदार आहेत. यातील प्रमुख विरोधी पक्ष वायएसआर  काँग्रेसच्‍या 67 आमदारांनी यापूर्वीच या संपूर्ण अधिवेशनावर बहिष्‍कार घातला आहे. अशात अधिवेशनात सत्‍ताधारी पक्षाचे 100 आमदार आणि भाजपचे 3 आमदारच उपस्थित राहत असत. आता 100 आमदारांनी सुटी घेतल्‍यामुळे ऐन अधिवेशनातच संपूर्ण विधानभवन रिकामे झाले आहे.   
 

बातम्या आणखी आहेत...