आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१०२ वर्षांची महिला बनली ग्रामपंचायत सदस्य, 160 मतांनी विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चामराजनगर (कर्नाटक) - काही मिळवण्याचा मनाशी पक्का निर्धार केला तर वय आडवे येत नाही. कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील डोड्डालातूर ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकणा-या गौतमम्मा या १०२ वर्षीय महिलेने हा वाक्प्रचार खरा करून दाखवला. त्यांनी या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा १६० मतांनी पराभव केला. कौडाहळ्ळी ग्रामपंचायतीच्या पुनर्रचनेनंतर निर्माण झालेल्या नवीन जागेवर गौतमम्माने उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले. प्रचार काळात त्यांनी प्रत्येक मतदाराची व्यक्तिश: भेट घेतली.