आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञांना अधिक वाव : मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हैसूर- देशातील आव्हानांची सोडवणूक संशोधनाच्या माध्यमातून केली जावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. सरकार संशोधन संस्थांमध्ये उत्कृष्ट संशोधनात्मक वातावरण निर्माण केले जाईल,असे मोदी सांगितले. म्हैसूर विद्यापीठ परिसरात आयोजित १३० व्या राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे त्यांच्या हस्ते उद््घाटन झाले.

मोदी शास्त्रज्ञांना म्हणाले, देशाचे भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे. मानवी कल्याण आणि देशाच्या आर्थिक विकासाचे लक्ष्य गाठण्यात तुम्ही मदत करावी. शास्त्रज्ञांनी अर्थव्यवस्था, पर्यावरण, ऊर्जा,सामाजिक आवश्यकता लक्षात घेऊन संशोधन करावे. सरकार केंद्र व राज्याच्या संस्थांमध्ये आणखी चांगला वैज्ञानिक समन्वय साधेल. यासोबत वैज्ञानिक संस्थांचे साइंटिफिक ऑडिटही केले जाईल. यातून त्यांचे खरे काम कळू शकेल. आतापर्यंत वैज्ञानिक संस्थांचे कॅग ऑडिट होत असून या ऑडिटला शास्त्रज्ञांचा विरोध आहे. शास्त्रज्ञांकडून कोणत्या प्रकारच्या संशोधनाची अपेक्षा केली जाते. शासन चालवण्यासाठी सरकारला विकासाशी संबंधित १७० अॅप्लिकेशनची आवश्यकता भासते. याच पद्धतीने शहराच्या विकासासाठी नवे टूल विकसित करणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रातही वाव आहे.
बातम्या आणखी आहेत...